उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांना गोरडवाडीच्या श्री बिरोबा यात्रेत सन्मानित करण्यात आले.
उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर आणि पैलवान गणेश जगताप यांच्या प्रेक्षणीय लढतीत पैलवान प्रकाश बनकर घुटना डावावर विजयी.
गोरडवाडी ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी गावचे ग्रामदैवत श्री बिरोबा देवाच्या यात्रे निमित्त सालाबाद प्रमाणे भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केलेले होते प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर आणि पैलवान गणेश जगताप यांच्या प्रेक्षणीय लढतीत उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर घुटना डावावर विजयी होऊन उपस्थित कुस्ती शौकीन व समस्त ग्रामस्थ यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
स्वर्गीय सौ.सजाबाई मल्हारी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांना मानाची ढाल देऊन सन्मानित करण्यात आले . गोरडवाडी गावचे माजी पोलीस पाटील मल्हारी कर्णवर पाटील. माजी सरपंच व सोसायटीचे माजी चेअरमन भागवत पाटील, उत्कृष्ट शाखा अभियंता गोविंद कर्णवर पाटील, प्रगतशील बागायतदार शशिकांत कर्णवर पाटील यांच्या परिवारांच्या वतीने सन्मानित करण्यात आले यावेळी गोरडवाडी गावचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणतात्या गोरड, माजी सरपंच रामचंद्र गोरड, संघर्षयात्री प्राध्यापक दादासाहेब हुलगे, युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, सोसायटीचे माजी चेअरमन खंडूतात्या पवार, युवा नेते संतोष गोरड, अण्णासाहेब गोरड आदी मान्यवरांसह कुस्ती शौकीन व गोरडवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा.https://bit.ly/31IKDng
This piece was both informative and amusing! For more, visit: LEARN MORE. Keen to hear everyone’s views!