उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांनी स्वागत केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर अनेकांनी अजित दादांचे स्वागत केले.
मुंबई ( बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे धाडसी व धडाडीचे नेते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे युवा आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते या दोन माळशिरस तालुक्यातील युवा आमदार यांनी नूतन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्णयाचे स्वागत करून त्यांना भविष्य कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा उलथापालत झालेली आहे मात्र या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित दादा पवार यांनी भाजपच्या विचाराच्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रगतीच्या व विकासाच्या कार्यावर प्रभावित होऊन व महाराष्ट्राच्या विकासाची दूरदृष्टी मनामध्ये ठेवून धाडसी व स्पष्ट वक्ता असणारे धडाडीचे नेते अजितदादा पवार यांनी भाजप विचाराच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनेक स्तरातून अजित दादा यांच्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे त्याच धर्तीवर युवा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते या दोन युवा आमदारांनी अजितदादांच्या निर्णयाचे स्वागत करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The clarity and depth of your explanation are commendable. For further reading, here’s a useful resource: EXPLORE FURTHER. Let’s discuss!