उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाचे आयोजन.

नातेपुते ( बारामती झटका )
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक 23 जुलै 2023 रोजी सकाळी 10 ते 04 या वेळेमध्ये श्री जंबुकुमार गौतमचंद दोशी गुरुकुल दहिगाव ता. माळशिरस येथे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रसाद समूहाचे संस्थापक उद्योजक श्री शरदबापू मोरे व सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष सदस्या सौ ऋतुजाताई मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

भव्य नेत्र तपासणी शिबिरामध्ये डॉक्टर निखिल गांधी डॉक्टर भिवा ज्ञा. भाळे, डॉक्टर जयपाल जे चोपडे, डॉक्टर एस एल माने, अशा नेत्र तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने नेत्र तपासणी कार्यक्रम होणार आहे तरी गरजू व सर्वसामान्य जनतेने लाभ घ्यावा असे शिवप्रसाद फाउंडेशन यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng