ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार सायकल वाटपाचा सुरेशआबा पालवे पाटील यांचा संकल्प..

सदाशिवनगर (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. २२ जुलै २०२३ रोजी सकाळी १० वाजता शिवामृत भवन मंगल कार्यालय, सदाशिवनगर येथे नीरा उजवा कालवा समितीचे व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सुरेश आबा पालवे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक सोशल फाउंडेशन व अजितदादा सोशल फाउंडेशन यांच्यावतीने मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे, विधानपरिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश दादा पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सायकल वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. १००० सायकल वाटपाचा संकल्प निरा उजवा कालवा समितीचे व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सुरेशआबा पालवे पाटील यांनी केला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

6 Comments

Leave a Reply

Back to top button