उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यासह मराठवाड्याचा कलंक पुसण्याचे काम केले आहे – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
मुंबई (बारामती झटका)
मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीनुसार माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपोले, अधिक्षक अभियंता कुमार पाटील, चिफ इंजिनिअर गुनाले, कार्यकारी अभियंता योगेश सावंत, यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले, आज दुसरी एक आनंदाची बातमी अशी आहे की धोमबलकवडीचे फलटण तालुक्यामध्ये जवळपास 54 गावांना पाणी देणारे धोमबलकवडी बारमाही करण्याकरता टेंडर मागील आठवड्यात झाले. बहुचर्चित असणाऱ्या निरा देवधरचे टेंडर आज प्रकाशित झाले. जिर्हे कटापूर योजनेचे मागील महिन्यामध्ये भूमिपूजन झाले. दहिगाव योजनेला मागील महिन्यामध्ये 102 कोटी रुपये शासनातर्फे देण्यात आले. अर्धवट राहिलेल्या पोंधवडी योजनेला 60 कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. याचबरोबर करमाळा तालुक्यातील मांगी तलावाचे कुकडीच्या लाभक्षेत्रामध्ये समाविष्ट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे सर्वे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. तुळशी, बावी, परितेवाडी, अंबड तसेच कुर्डू ह्या गावांचा समावेश सीना माढाच्या शिल्लक राहिलेल्या पाण्यामुळे या गावांना सिंचनासाठी पाणी देण्याचे सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खैराव, मानेगाव तसेच सांगोला उपसा सिंचन या दोन्ही योजनेला तत्वतः मान्यता दिली आहे. सांगोला उपसा सिंचन योजनाही सुप्रमासाठी या महिन्यांमध्ये कॅबिनेटला येतील. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी खैराव मानेगाव ही योजना या महिन्यामध्ये कॅबिनेटला येतील. जवळपास माढा मतदार संघामधील या दहा ते बारा योजना जवळजवळ हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आत्ताचे नूतन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सर्वांचे आभार मानले. आणि या दैदिप्यमान कारकिर्दीत पश्चिम महाराष्ट्राचा विशेष करून सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचा तसेच मराठवाड्याचा कलंक पुसण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांना दीर्घ आयुष्य लाभावी अशी प्रार्थना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आई जगदंबेच्या चरणी केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng