उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या आगमनाची सदाशिवनगर येथे जय्यत तयारी.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना विस्तारीकरण व नूतनीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची गतवैभवाकडे वाटचाल सुरू असताना ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद, कामगार व व्यापारी यांच्यामधून समाधान
सदाशिवनगर (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते श्री शंकर सहकारी साखर कारखाना विस्तारीकरण व नूतनीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. सदरच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सदाशिवनगर येथे सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधान परिषदेचे युवा आमदार व कारखान्याचे चेअरमन रणजीतसिंह मोहिते पाटील यांची श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची गतवैभवाकडे वाटचाल सुरू असल्याने ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद, कामगार व व्यापारी यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील विकासाची आर्थिक नाडी असणारा श्री शंकर सहकारी साखर कारखाना आहे. सदरच्या कारखान्यामुळे विकासाला चालना मिळालेली आहे. गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी दुष्काळ, आर्थिक अडचणी व अधिकारी यांच्यामुळे कारखाना अडचणीत येऊन बंद पडलेला होता. त्यामुळे माळशिरस तालुक्याच्या पंचक्रोशीतील अनेक गावांचे जीवनमान ढासळले होते. शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्न निर्माण झालेला होता. यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी सदरचा कारखाना निवडणुकीतून ताब्यात घेतला. बंद पडलेला कारखाना सुरू करीत असताना अनेक अडचणींना सामोरे जाऊन सदरचा कारखाना सुरू झालेला होता.
दोन वर्षांमध्ये कारखान्याने पहिल्या सीजनला दोन ते अडीच लाख व दुसऱ्या सीजनला चार ते साडेचार लाख उसाचे कृषी केलेले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागण झालेली आहे. भविष्यात कारखान्याची क्षमता वाढवून नूतनीकरण करण्याची गरज असल्याने कारखान्याचे चेअरमन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रातील आजारी असणारे कारखाने यांच्या चेअरमन व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत कारखान्याला आर्थिक निधी मिळावा, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत बैठका सुरू होत्या. दिल्ली, मुंबई अशा वाऱ्याकरून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमितजी शहा त्यांच्या माध्यमातून कारखान्यांना आर्थिक मदत झालेली आहे.
सदाशिवनगर कारखाना सुरू झाल्यापासून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद, व्यापारी व स्थानिक नागरिक यांचे जीवनमान उंचावलेले होते. सदाशिवनगर कारखान्यामुळे आसपासच्या वीस ते पंचवीस गावांचा दैनंदिन व्यवहारासाठी व शिक्षणासाठी संबंध येत होता. कारखाना काही वर्ष बंद असल्याने अनेकांचे जीवनमान उध्वस्त झालेले होते. सध्या कारखान्याचे विस्तारीकरण व नूतनीकरण होणार असल्याने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची गतवैभवाकडे वाटचाल सुरू असल्याने ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद, कामगार व व्यापारी यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I thoroughly enjoyed this article. The author’s perspective was fascinating and left me with a lot to think about. Let’s dive deeper into this subject. Click on my nickname for more insights!