उपळे येथील प्रा. सौ. वासंती कुलकर्णी दुःखद निधन
बार्शी (बारामती झटका)
उपळे (दु.), ता. बार्शी, येथील प्रा. सौ. वासंती कुलकर्णी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ होते. त्या उपळे (दु.) येथील डॉ. मुकुंद कुलकर्णी यांच्या पत्नी तसेच जिल्हा भाजपा उपाध्यक्षा सौ. पद्मा काळे यांच्या नणंद होत्या.
सौ. वासंती कुलकर्णी यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ येथील तंत्रनिकेतनमध्ये सुमारे 18 वर्ष सेवा केली. तसेच त्यांनी झाडबुके महाविद्यालय बार्शी, सुलाखे हायस्कूल, बार्शी येथेही गणित विषयाच्या अध्यापनाचे कार्य विनामोबदला केले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
प्रा.सौ. वासंती कुलकर्णी यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि कुलकर्णी परिवारास या दु:खातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng