Uncategorized

एमआयटी कॉलेज, वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल १००%

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर येथील एमआयटी कॉलेज, वाखरीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून, संस्थेचा निकाल १००% लागला आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या परीक्षेत पंडिलवार रिशीत संदीप (९२.८३) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर देशमुख प्रतीक्षा तुकाराम (८७.६७) हिने द्वितीय आणि कोठारी पार्थ कल्पक (८४.६७) याने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे हेड मिस्ट्रेस शीबानी बॅनर्जी आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेच्या या उत्कृष्ट निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button