औरंगाबाद व नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर झाले एक मत थेट जनतेतील सरपंचांना अधिकार दोन मत.
….. अखेर थेट जनतेतील सरपंचांना उपसरपंच निवडीतील अधिकारावर पडदा पडला.
थेट जनतेतील सरपंच यांना दोन वेळा मतदान करण्याचा परिपत्रकानुसार अधिकार
माळशिरस ( बारामती झटका )
थेट जनतेतील सरपंच यांना उपसरपंच निवडीसाठी दोन वेळा मतदानाचा अधिकार ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दि. 03/01/2023 रोजीचा दिलेल्या निर्णयात सुधारणा करून औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णयावर ठाम राहुन दि. 04/01/2023 रोजी निर्णय दिलेला असल्याने औरंगाबाद व नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर झाले एक मत. थेट जनतेतील सरपंचांना अधिकार दोन मत असा निर्णय झालेला असल्याने अखेर थेट जनतेतील सरपंचांना उपसरपंच निवडीतील अधिकारावर तर्कवितर्क चर्चेला पूर्णविराम होऊन पडदा पडलेला आहे.
ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट पिटीशन क्रमांक 23/2023 दाखल करण्यात आली होती. दि. 04 जानेवारी 2023 रोजीच्या निर्णयामध्ये सुधारणा करून सरपंचांना सुरुवातीला तसेच निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याचा निर्णय दिलेला असल्याने औरंगाबाद व नागपूर खंडपीठाचे निर्णयावर एकमत झालेले असल्याने थेट जनतेतील सरपंच यांचा उपसरपंच निवडीच्या प्रक्रियेमध्ये अधिकारावर निर्णय झालेला आहे.

उपसरपंच निवडीसाठी सरपंचाला दोन वेळा मतदान करण्याच्या अधिकाराविरुद्धच्या याचिका औरंगाबाद व नागपूर खंडपीठाने फेटाळल्या आहेत. उपसरपंचाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत व समसमान मते मिळाल्यास निर्णायक मत म्हणून एक मत देण्याचा सरपंचाला अधिकार देण्याबाबत ग्रामविकास मंत्रालयाने दि. 20 सप्टेंबर 2022 रोजी परिपत्रक काढले होते. ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. यावर मंगळवारी सुनावणी करताना या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. तर नागपूर खंडपीठाने बुधवारी सुनावणी करताना याचिका फेटाळली आहे.
माळशिरस तालुक्यातील 35 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. 06,09,10 तारखांना उपसरपंच पदाच्या निवडी होणार आहेत. सरपंचांना निर्णायक मत देण्याचा निर्णय झालेला असल्याने अनेक ग्रामपंचायतीची राजकीय समीकरणे बिघडणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng