ताज्या बातम्याराजकारण

शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यातून क्रेझ वाढवली

लोकसभा निवडणूक चर्चा व नूतन पदाधिकारी यांच्या निवडीची बैठक उत्साहात व खेळीमेळीत पार पडली.

विझोरी (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार शेतकऱ्यांचा पांडुरंग राजू शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा असणारे स्वाभिमानीची मुलुख मैदानी तोफ रविभाऊ तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजीकाका बागल यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यक्षम तालुकाध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी जिल्हा व तालुका कार्यकारणी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात दिलासा देऊन वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढून प्रशासनाला जाग आणण्याचे काम केलेले आहे. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांविषयी समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कार्यकर्त्यांनासुद्धा आंदोलने, मोर्चे केलेल्याचे समाधान मिळत आहे. दिवसेंदिवस माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची क्रेझ वाढत आहे. तळागाळातील कार्यकर्ते संघटनेमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विझोरी, निमगाव पाटी येथील संपर्क कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात व नूतन पदाधिकारी निवडीची बैठक स्वाभिमानी संपर्क कार्यालयात संपन्न झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून मकर संक्रांतिनिमित्त सर्वांना तिळगुळ देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख, जेष्ठ नेते शिवाजी चव्हाण, जेष्ठ नेते मगन काळे, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भोसले, जेष्ठ मार्गदर्शक डॉ. सचिन शेंडगे, माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सिराज तांबोळी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी नूतन पदाधिकारी म्हणून प्रा. विठ्ठल मदने, (स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक), दीपक सावंत (तालुका कार्याध्यक्ष), काका कागदे (तालुका युवा संघटक), समाधान खपाले (तालुका सचिव), नाथाजी मदने (सचिव), नामदेव सावंत (युवा तालुका कार्याध्यक्ष), अज्ञान कोळेकर (तालुका सरचिटणीस) यासह दत्ता घोगरे, हनुमंत बर्वे यांनी संघटनेत प्रवेश केला व संघटनेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

यावेळी तालुक्यातील संघटनेचे विद्यितज्ञ ॲड. सिताराम झंजे, राजाराम बोरकर, रसूल सय्यद, सचिन बोरकर, राजाभाऊ खरात, प्रदीप पाटील, विजय वाघंबरे, महेश चव्हाण, सुनील दोलतडे, महेश खिलारे, समाधान खिलारे, समाधान घुले, मुकुंद काळे, मुसा शिंदे, आप्पा शिंदे, सोमेश्वर राजगे, सचिन मदने, संदीप कपने, किशोर गोरवे, सुभाष माने आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort