औषध विक्री प्रतिनिधी चेतन गुर्रम यांचे अपघाती निधन.
अकलूज (बारामती झटका)
अशोक चौकातील भावनाऋषी पेठेतील मेडिकल रिप्रेझेटिटिव्ह चेतन लक्ष्मीनारायण गुर्रम वय 32याचं बुधवारी दुपारी अपघाती निधन झाले आहे. औषध विक्री कंपनीत सेल्समन म्हणून कामास असलेले चेतन लक्ष्मीनारायण गुर्रम हे नेहमीप्रमाणे कामावर गेले.सोलापूरहून स्वतःच्या मोटारसायकलवरून ते नियमितपणे जिल्हातील औषध विक्री नोंदीसाठी आपल्या सहकार्यासह बार्शीहून नान्नजकडे निघालं असता नान्नज जवळ चेतन गुर्रम यांच्या मोटारसायकलचा चाक बस्ट झाल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि ते थेट डोक्यावर आपटल्याने मोटारसायकलवरील दोघे खाली कोसळले.चेतनच्या साथीदार दुखापत झाली मात्र चेतनला डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तातडीने चेतनला सोलापुरातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.चेतनला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेल्यानंतर तेथे गुर्रम कुटूंबियांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.आणि नेत्र शासकीय रुग्णालयाकडे सुपूर्द केले. चेतन यांच्या पश्चात आई,वडील, बहिण,पत्नी, 2मुले,1मुलगी असा परिवार आहे. चेतनला गेल्या 20दिवसापुर्वीच मुलगी झाल्याने घरात आनंदाचे वातावरण पसरले होते.अचानकपणे हा प्रकार घडल्याने गुर्रम कुंटूबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चेतन यांच्या पार्थिवावर सायंकाळी पद्मशाली स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या अपघाताची माहिती कळताच मेडिकल रिप्रेझेटिटिव्हच्या प्रतिनिधीनी रुग्णालय तसेच घराजवळ गर्दी केली. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सरचिटणीस तथा अखिल भारत पद्मशाली संघमचे सचिव सत्यनारायण गुर्रम यांचे ते पुतणे होते.
Great mix of humor and insight! For additional info, click here: READ MORE. Any thoughts?