कचरेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ. उज्वलाताई हनुमंतराव सरगर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील व ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष हनुमंतराव सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांचे अर्ज दाखल.
कचरेवाडी ( बारामती झटका )
कचरेवाडी ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदासाठी जय हनुमान ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. उज्वलाताई हनुमंतराव सरगर यांनी उमेदवारी अर्ज मंगळवार दि. २९/११/२०२२ रोजी सकाळी ११ वा. उमेदवारी कचरेवाडी ग्रामपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी पी. टी. शिंदे यांच्याकडे अर्ज दाखल केले.

त्यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सौ. प्रेमलता निवृत्ती पाटील, श्री. लक्ष्मण दत्तू धायगुडे, सुभाबाई नामा सरगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यावेळेस गावातील आजी-माजी प्रतिष्ठित व जय हनुमान ग्रामविकास पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ. मारुतीराव पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बीज उत्पादन संस्थेचे व्हाईस चेअरमन भाजपा ओबीसी सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष हनुमंतराव सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनल कचरेवाडी यांच्यावतीने सरपंच व सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
