करमाळा एमआयडीसी भूखंडाचे दर कमी करावेत, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची मागणी
करमाळा ( बारामती झटका )
करमाळा एमआयडीसी मधील भूखंडाचे दर सोलापूर एमआयडीसी पेक्षा जास्त असून हे दर कमी करून तात्काळ भूखंडाचे वाटप सुरू करावेत, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे
मुंबई येथील उदय सामंत यांच्या निवासस्थानी महेश चिवटे यांनी भेट घेतली.
यावेळी करमाळा एमआयडीसी मध्ये झालेल्या मूलभूत सुविधांविषयी माहिती दिली. यावेळी करमाळा एमआयडीसी विकसित करण्यासाठी उजनी धरणावरून किंवा सीमा कोळगाव प्रकल्पामधून स्वतंत्र पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी 24 तास उपलब्ध करून द्यावेत, उपलब्ध असलेल्या भूखंडामध्ये तात्काळ डांबरी रस्ते, गटारी, स्ट्रीटलाईट याचे टेंडर करून कामकाज करावे. सध्या करमाळा एमआयडीसीमध्ये पाणी उपलब्ध करण्यासाठी एक विहीर खोदण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे मात्र, या विहिरीचे पाणी प्रकल्पांना पुरवू शकणार नाही.
सध्या झालेली रस्त्याचे कामे ही निकृष्ट दर्जाचे झाली असून ठेकेदाराने हलगर्जीपणा केल्यामुळे केलेले रस्ते उध्वस्त झाल्याचे उद्योग मंत्र्यांचे निदर्शनास आणून दिले.
एमआयडीसीमधील भूखंडाचे दर प्रमाणापेक्षा जास्त असल्यामुळे उद्योजक येथे येण्यास टाळाटाळ करत आहेत. सोलापूर एमआयडीसी पेक्षा करमाळा दर जास्त आहे. प्लॉट वाटप करण्यापूर्वीच अजून पंधरा टक्केची दरवाढ केली आहे. या भावात तर जमिनी विकत मिळतात, अशी तफावत आहे.
एमआयडीसी विकसित करायचे असेल तर भूखंडाचे दर कमी करणे गरजेचे आहे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व विषयासंदर्भात एक विशेष बैठक लावून हे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Поиск в гугле