करमाळा शहर विकासासाठी दोन कोटी मंजूर झाल्याची जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांची माहिती
करमाळा (बारामती झटका)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या सहकार्याने करमाळा शहराच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या रस्त्याची कामे चांगल्या दर्जाची व्हावीत, यासाठी शिवसेना दक्ष राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी तालुका प्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, शहर प्रमुख विशाल गायकवाड, महिला आघाडी तालुकाप्रमुख प्रियंका गायकवाड, उपशहर प्रमुख नागेश, महिला आघाडी शहर प्रमुख पुष्पाताई शिंदे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदी उपस्थित होते.
या विकासकामांमध्ये श्रावण नगर येथे रस्ते डांबरीकरण व गटार काम करणे ५५ लाख रु., राशिन पेठतील रस्ता डांबरीकरण करणे २५ लाख रु., राशीन पेठ रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटार बांधकाम करणे ३० लाख रु., कृष्णाजी नगर ते नेटके हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण करणे २० लाख रु., नेटके हॉस्पिटल ते बाहुबली घर ते वीर बिल्डिंग रस्ता डांबरीकरण करणे ३० लाख रु., निकम घर ते राजमाने घर काँक्रीट गटार बांधणे १० लाख रु., रामभाऊ दळवी घर ते सुरेश लोणकर घर काँक्रीट रस्ता गटावर काम करणे ३० लाख रु. अशा प्रकारे दोन कोटी रुपयांचा निधी नगर विकास खात्याकडून वैशिष्ट्यपूर्ण नगर विकास निधीतून मंजूर करण्यात आला आहे.

करमाळा शहरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचा १५ कोटी रु. व करमाळा बायपास मौलाली माळ सात नळाच्या विहिरीच्या बाजूने थेट पुणे रस्ता या बायपास मंजूर रस्त्यासाठी १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. आरोग्य मंत्री प्रा. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत लवकरच या कामासंदर्भात मंत्रालयात बैठक होणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे
कामे दर्जेदार करा – प्राध्यापक शिवाजीराव सावंत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे करावा. सर्व रस्त्याचे, गटार बांधकामाची कामे उच्च दर्जाची इस्टिमेट प्रमाणे करावी. ठेकेदारावर लक्ष देऊन चांगल्या दर्जाची कामे करून घेण्यासाठी शिवसैनिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng