Uncategorizedताज्या बातम्या

कर्चे परिवारांच्यावतीने संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज षष्ठी उत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथील बोराटे वस्ती येथे कर्चे परिवाराच्या वतीने शुक्रवार दि. १० मार्च ते सोमवार दि. १३ मार्च या दरम्यान श्री संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज षष्ठी उत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, अशा पवित्र भूमीमध्ये चला जाऊ स्वल्प वाटे, वाचे गाऊ विठ्ठल या न्यायाने वै. ह.भ.प. निवृत्ति बुवा पैठणकर, वै. ह.भ.प. सुखदेव महाराज भाबड यांच्या कृपाशीर्वादाने तसेच वै. ह.भ.प. मनोहर महाराज भगत यांच्या प्रेरणेने संपन्न होत आहे. सोमवार दि. १० मार्च रोजी सकाळी ११ वाजता सप्ताहाचा शुभारंभ व पुजनाचा कार्यक्रम गावातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न होईल.

दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकडारती, सकाळी पारायण, सायंकाळी हरिपाठ, रात्री ९ ते ११ किर्तन, सप्ताहातील किर्तन महोत्सव दि. १० मार्च रोजी ह.भ.प. भगत महाराज नातेपुते, दि. ११ मार्च रोजी ह.भ.प. अभिमन्यू महाराज कदम, दि. १२ मार्च रोजी ह.भ.प. आरती महाराज भुजबळ, दि. १३ मार्च रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत फुलांचे किर्तन ह.भ.प. कैलास महाराज केंजळे धर्मपुरी यांचे होईल व महाप्रसाद होऊन कार्यक्रमांची सांगता होईल.

या सप्ताहात ह.भ.प. बाबुराव महाराज शेकापुरे, ह.भ.प. भगत महाराज नातेपुते, ह.भ.प. कदम महाराज, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सह बोराटे वस्ती भजनी मंडळ व नातेपुते भजनी मंडळ, ग्रामस्थ, भाविक मंडळी या कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांस परिसरातील भाविकांनी सहकार्य करून या श्रवण सुखाचा आनंद लुटावा, असे आवाहन कर्चे परिवारांच्या वतीने व बोराटे वस्ती भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

Leave a Reply

Back to top button