कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ सहकार्यांचा मानसन्मान – बी. टी. शिवशरण
श्रीपूर (बारामती झटका)
श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक मालक यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त व श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३२वा बायलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम श्रीपूर येथे कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला. मोठे मालकांचे सहकारी तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सुरूवाती पासून पांडुरंगला ऊस पुरवठा करणारे ज्येष्ठ शेतकरी सभासद यांचा चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांच्याहस्ते आपुलकीने स्वागत करुन मानसन्मान व सत्कार करण्यात आला.
आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना कारखान्यावर बोलाऊन त्यांचा करण्यात आलेला सत्कार व मोठ्या मालकांच्या आठवणी यात रमलेले हे सर्व ज्येष्ठ हा सोहळा एक केवळ आठवण नाही तर आपुलकी, जिव्हाळा नात्यात गोडवा निर्माण करणारा सुखद क्षण आहे.


चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांनी या ज्येष्ठ व मोठ्या मालकांच्या सानिध्यात राहिलेल्या ज्येष्ठ सहकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, प्रत्येकजण कळसाचे दर्शन घेतो मात्र, पायाचा दगड राहिलेल्यांना विसरून जातो. हे सर्वजण मोठ्या मालकांच्या बरोबरीने पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत पायाचा दगड बनले आहेत. शेतकऱ्यांच्या गरजेतून ऊभा केलेला हा कारखाना विस्तारीकरण करत पुढील वर्षी दहा हजार टनी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

