कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांनी सहकार चळवळ समृद्ध केली – ॲड. प्रकाशराव पाटील
श्रीपूर ( बारामती झटका)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांनी निस्वार्थी भावनेने व सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सहकार चळवळ त्यांनी समृद्ध केली. आजारी अवस्थेत असलेला आगाशे यांचा खाजगी साखर कारखाना विकत घेऊन तो सहकारी तत्वावर चालवून नावारूपाला आणण्याची जबाबदारी व मोठं काम त्यांनी केलं, अशी भावना ॲड. प्रकाशराव पाटील बोरगांवकर यांनी व्यक्त केली. आज श्रीपूर येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ३२ वा बायलर अग्नी प्रज्वलित करण्यात आला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
आज पांडुरंग परिवाराचे दैवत संस्थापक आदरणीय सुधाकरपंत परिचारक मालक यांची ८७ वी जयंती कारखाना कार्यस्थळावर साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्या स्पर्धेचे युग आहे. जे कारखाने यापुढे अधिक गाळप सर्वाधिक उतारा काढतील तेच टिकतील. पुढील वर्षी पांडुरंग सहकारी साखर कारखाना दहा हजार टनी करण्यात येईल. तसेच डिस्टलरी विस्तारीकरण झाले आहे. आ. सुधाकर पंत परिचारक मालक यांनी सदर कारखाना विकत घेताना तो इथेच चालवला जाईल, अशी हमी ज्ञानेश्वर आगाशे साहेब यांना दिली होती. त्यामुळे हा कारखाना विस्तारीकरण करण्यात जागेची अडचण जरी येत असली तरी श्रीपूर येथेच चालवला आहे, असे सांगितले.
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक यांची जयंती असल्याने त्यांचे सुरुवातीचे सर्व सहकार्यांना बोलावून त्यांचे हस्ते बायलर अग्नी प्रज्वलित करण्यात आला. त्या सर्वांचा सन्मान करुन कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक मालक यांची प्रतिमा भेट दिली. या कार्यक्रमाला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिलीप अप्पा घाडगे, ज्येष्ठ संचालक दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, महाळुंगचे ज्येष्ठ नेते रामचंद्र सावंत पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन ॲड. प्रकाशराव पाटील, भाजपचे प्रांतीक सदस्य राजकुमार पाटील, महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे पाटील, नगराध्यक्ष अशोक चव्हाण, नानासाहेब मुंडफणे, माजी व्हा. चेअरमन दिलीप चव्हाण, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मदनबापू पाटील, पंढरपूर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सामाजिक सहकारी संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांनी केले. सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समवेत जिल्हा सहकारी बँकेच्या व्हा. चेअरमन पदावर काम केलेले ॲड. प्रकाशराव पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था, सहकारी चळवळ ही सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील लोकनेते गणपतराव देशमुख, सुधाकरपंत परिचारक तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांनी सक्षम केली. अतिशय पारदर्शक व प्रामाणिक काम करण्याची त्यांची भूमिका होती. अशा मोठ्या नेत्यांच्या सहवासात मला जिल्हा पातळीवर, विविध पदांवर काम करता आलं, हे माझे भाग्य समजतो. अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिव्हिल ओहरसियर हणुमंत नागणे यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी व्हा. चेअरमन दिलीप चव्हाण यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This piece was both insightful and entertaining! For additional info, visit: FIND OUT MORE. What do others think?