“काय दाढी, काय टोपी, काय चष्मा, काय जाकीट, संपादकाचे एकदम कसं ओकेच काम हाय.’.. आमदार शहाजीबापू पाटील
पुणे (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदार संघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पुणे येथील सिंचनभवन येथे माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन योजनेची आढावा बैठक आयोजित केलेली होती. सदरच्या बैठकीस खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले साहेब, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांची आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.
पत्रकारांना बैठकीमध्ये सविस्तर माहिती खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर आ. शहाजीबापू पाटील , आमदार संजयमामा शिंदे, आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. पत्रकार परिषद संपल्यानंतर देशासह विदेशामध्ये एकाच डायलॉगने सुप्रसिद्ध झालेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी बारामती झटका यूट्यूब चॅनल व वेब पोर्टल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना “काय दाढी, काय टोपी, काय चष्मा, काय जाकीट, संपादकाचे एकदम कसं ओकेच काम आहे”, असा नवीनच डायलॉग करून जुन्या आठवणीला उजाळा दिलेला आहे.
माळशिरस तालुक्यातील २२ गावे पूर्वी सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडलेली होती. त्या २२ गावांमध्ये मळोली हे गाव सुद्धा होते. शहाजी बापू पहिल्यांदा आमदार झाले होते त्यावेळेस माळशिरस तालुक्यातील २२ गावांचे मतदान निर्णायक ठरलेले होते. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचे शहाजीबापू पाटील यांच्याशी जिव्हाळ्याचे मैत्रीचे व नातेसंबंध आहेत.
आ. शहाजीबापू पाटील आणि श्रीनिवास कदम पाटील यांचे राजकारणापलीकडील मैत्रीचे व नातेसंबंध आहेत. जुन्या आठवणीला उजाळा देत “काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, आमचं कसं एकदम ओके हाय”, या डायलॉगने देश विदेशामध्ये सुपरिचित असणारे शहाजीबापू पाटील यांनी संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यावर “काय दाढी, काय टोपी, काय चष्मा, काय जाकीट, संपादकाचे एकदम काम कसं ओके हाय”, असा डायलॉग बोलले असल्याने, खासदार, आमदार, अधिकारी यांच्यासह के. के. पाटील सोपानकाका नारनवर, बाळासाहेब सरगर, संजय देशमुख, युवराज वाघमोडे व इतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलेला होता.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng