पुरंदावडे येथे श्री रेणुका मातेची तीन दिवस यात्रा होणार
पुरंदावडे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री रेणुका मातेची यात्रा शनिवार दि. ३/१२/२०२२ ते सोमवार दि. ५/१२/२०२२ या कालावधीत संपन्न होत आहे.
मार्गशीर्ष शुद्ध ११ शनिवार दि. ३/१२/२०२२ रोजी श्री रेणुका मातेस साडीचोळी कार्यक्रम व सायंकाळी श्री. नाळे मळा येथे माहेरघरी पालखी असणार आहे. मार्गशीर्ष शुद्ध १२ रविवार दि. ४/१२/२०२२ रोजी गंध लिंब, दुपारी महानैवेद्य व सायंकाळी ७ वा. मानाच्या फुलाचा कार्यक्रम त्यानंतर रात्री ८ ते ११ जनजोगती यांचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मार्गशीर्ष शुद्ध १३ सोमवार दि. ५/१२/२०२२ रोजी सकाळी महाआरती व गावातून माहेरघरासाठी छबिना व रथ मिरवणूक दुपारी ४ वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर ४ ते ५.३० किचाचा कार्यक्रम संपन्न होत आहे.


या यात्रेला सर्व भाविक भक्तांनी सहभागी होऊन शोभा वाढवावी, असे आवाहन श्री रेणुका माता देवस्थानच्या प्रमुख जगूबाई बाजी मोहिते तसेच पुजारी शिवाजी मोहिते, दादा मोहिते आणि आदित्य मोहिते यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
