शहाजीनगर येथे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गजरात गुरुचरित्रास सुरुवात
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते वीणा पूजन संपन्न
इंदापूर (बारामती झटका)
शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थानमुळे परिसराला चैतन्य मिळाले असून धार्मिक, सामाजिक व अन्नदानाचे, हरिनामाचे कार्य या देवस्थानच्या माध्यमातून अखंड चालले असून, तालुक्यातील व तालुक्याबाहेरील भक्तगणांचे श्रद्धास्थान दत्त देवस्थान ठरले आहे, असे गौरवोद्गार इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील यांनी काढले.

श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त शहाजीनगर रेडा येथील दत्त देवस्थान येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र पारायणाची सुरुवात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याहस्ते वीणा पूजन, गुरुचरित्र पूजन करून गुरुवार दि. १ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली. यावेळी गणेश पूजन, टाळ मृदंग पूजन इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थितांचे स्वागत दत्त देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते, तानाजीराव गायकवाड यांनी केले. पहाटेची महापूजा रेडा गावच्या सरपंच सौ. सुनिता नानासाहेब देवकर, युवक नेते नानासाहेब देवकर व उपसरपंच सचिन हरिदास देवकर, सौ. भाग्यश्री सचिन देवकर यांच्या हस्ते पार पडली. यावेळी उपस्थित भक्तगणांना माजी सभापती मयूरसिंह पाटील मार्गदर्शन करीत होते.


पुढे बोलताना मयूरसिंह पाटील म्हणाले की, गुरुचरित्र पारायण सोहळा, दत्त जन्मानिमित्त दत्त देवस्थान परिसरातील तमाम नागरिकांना, भजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान यामुळे वरदान ठरत असून मानवी जीवन आनंदी राहण्यासाठी हरिनामाचा यज्ञ सुरू असल्याचा मनोमन आनंद वाटतो. इंदापूर तालुका व माळशिरस तालुका या दोन्हीही तालुक्यातील ऋणानुबंध राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे अधिकचे घट्ट झालेले आहेत. त्यामुळेच नव्या पिढीला सुसंस्कृत आदर्श माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील ठरत आहेत, अशीही माहिती पाटील यांनी दिली.
यावेळी रेडा गावच्या माजी उपसरपंच बायडाबाई बाबर, ह.भ.प. तुकाराम महाराज काळकुटे, सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे, ह.भ.प. तानाजी देवकर, गजेंद्र शिंदे, प्रसाद देवकर पाटील, विकीन गुळवे, डॉ. धर्मराज देवकर, गणपत लवटे, माजी सभापती नितीन वाघमोडे, सतीश राऊत, श्याम इनामे, सोमनाथ मोहिते, पांडुरंग मोहिते यांच्यासह दत्तभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्त देवस्थानचे नीलकंठ मोहिते यांनी केले तर आभार कैलास पवार यांनी मानले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng