काळजी करू नका, आमचा परिवार आणि आमचा पक्ष कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो; अजितदादा पवारांचे वक्तव्य

पुणे (बारामती झटका)
‘आमचा परिवार आणि आमचा पक्ष कसा व्यवस्थित ठेवायचा, याची काळजी करू नका. मी पाहतो आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जेजुरीला जाण्याआधी पुण्यात साखर संकुलमध्ये ते काही वेळ थांबले होते. तिथे त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.
शाह यांना जयंत पाटील भेटलेच नाहीत. भेटले असे सांगतात ते धादांत खोटे आहे. ते सांगतात ते बरोबर आहे. ते आदल्या दिवशी पवार साहेबांबरोबर होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्यांच्याबरोबरच होते. ते इकडे आले, शाह यांना भेटले, यात काहीही तथ्य नाही,’ असे पवार म्हणाले. ‘तुम्ही प्रवेश केला, त्यावेळी तुम्ही आम्ही भेटलोच नाही, असे सांगितले होते,’ याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, ‘मी खरोखरच भेटलो नव्हतो. पाठिंबा दिला त्यानंतरच भेट घेतली. आधी भेट झालीच नव्हती.’
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng