कुर्डुवाडी शहरात भटके कुत्रे, पाळीव जनावरांमुळे वाहतूक कोंडी – सुनिता नाळे
मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा बंदोबस्त करा, जनशक्ती संघटना कुर्डूवाडी महिला आघाडीचा आंदोलनाचा इशारा
लऊळ (बारामती झटका)
कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठांसह दुचाकी स्वारावरांवर कुत्र्यांचा हल्ला होत असल्याने दहशतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा, जनावरांचा त्वरित बंदोबस्त करा, अशी मागणी जनशक्ती महिला कुर्डूवाडी शहर प्रमुख सुनिता नाळे यांनी केली आहे.
नागरिक रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला देत आहेत, हेच कुत्रे पुढे त्रासदायक ठरत आहेत. पण नागरिक याचा विचार करत नाहीत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कडक नियमावली तयार केली पाहिजे असे नाळे म्हणाल्या.
शहरात मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्याचा त्रास दिवसेंदिवस वाढला आहे, ठिकठिकाणी रस्त्यावर व गल्लीबोळात या जनावराचा वावर सर्रास आढळून येत आहे. भटक्या कुत्र्याकडून तर अनेकांना चावा घेण्याचे प्रकारही घडत असतांना यावर नियंत्रण ठेवणारे नगरपरिषद प्रशासनच या समस्येपुढे हतबल असल्याचे दिसून येत आहे. वाहनांच्या समोर आल्यावर अपघातही घडत आहेत.
कुर्डूवाडी शहरात गेली अनेक वर्ष भटक्या कुत्र्यांची आणि गुरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वेळोवेळी नागरिकांनी यावर आवाज उठवूनही केवळ कायदेशीर बाबी आणि तांत्रिक अडचणी पुढे करत प्रशासनाने नेहमीच हात झटकण्याची भुमिका स्विकारली आहे. परिणाम आज शहरात गल्लीबोळात तसेच रस्त्यावर मोकाट गुरे आणि भटके कुत्रे याचा वावर हमखास दिसून येत आहे. कुत्र्यांकडून तर अनेकांना चावा घेण्याच्या घटना शहरात घडत असतांना नागरिकांना हाॅस्पीटलच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या तर पालिका प्रशासनाला नव्हे तर व्यावसायिक, वाहनधारक यांनाही सहन करावी लागते. कुत्र्यांच्या टोळीच्या टोळी रस्त्यावर असल्याने महीला वर्ग तसेच शालेय विद्यार्थी, लहान मुले रस्त्यावरुन जाण्या येण्यास घाबरतात. मोकाट कुत्र्यांचा व भटक्या जनावरांचा वावर कमी न केल्यास जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुर्डूवाडी महिला शहर अध्यक्षा सुनिता नाळे यांनी दिला आहे.
यावेळी सौ. रेश्मा दिवे कुर्डूवाडी शहर महिला आघाडी कार्याध्यक्ष, सौ. सुनीता किशोर नाळे कुर्डूवाडी शहर महिला आघाडी शहर, माधुरीताई टोणपे तालुका प्रमुख महिला आघाडी, उर्मिला कोळी, राणी लोंढे आदींसह महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I found this article to be both engaging and educational. The points made were compelling and well-supported. Let’s talk more about this. Check out my profile for more interesting reads.
Howdy! Do you know if they make any plugins to help with Search Engine
Optimization? I’m trying to get my website to rank for
some targeted keywords but I’m not seeing very good success.
If you know of any please share. Thanks! You
can read similar text here: Wool product