कुसमोड येथील लक्ष्मीनगर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न
पिलीव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लक्ष्मीनगर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे उदघाटन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशदादा पाटील, सरपंच तुषार लवटे, केंद्र प्रमुख राजकुमार फासे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाटील, उपसरपंच राणी पवार, दामोदर लोखंडे, विश्वजीत गोरड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.


यावेळी प्रास्ताविक मुख्याध्यापक सुहास कोल्हे यांनी केले. यामध्ये शाळेच्या गुणवत्ता व इतर वेगवेगळ्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी अंगणवाडी व जि. प. मधील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी गाणी, लावणी यावर आकर्षक अश्या प्रकारचे नृत्य सादर करुन उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य शहाजी लेंगरे, स्वाती मदने, प्रमोद भैस, लक्षमण पवार, देवीदास पाटील, पिलीव केंद्रातील तसेच चांदापुरी व आसपासच्या परीसरातील शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विविध शिक्षक संघटनाचे नेते यामध्ये दिलीप ताटे, शरद रुपनवर, विजय शिंदे, मनोहर एकतपुरे, आत्माराम गायकवाड, नवनाथ धांडोरे, शाळेच्या उपाध्यक्षा रुपाली मदने, शिक्षण तज्ञ प्रियंका मदने, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका सत्यभामा मदने, सहशिक्षक सुनील डुरे यांनी सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
यावेळी सर्व देणगीदारांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी दामोदर लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. तर जिल्हा नियोजन समिती सदस्य के. के. पाटील, जि. प. सदस्य यांनी शाळेस सहकार्य करणार असल्याचे सांगीतले. तसेच यावेळी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये नवोदयला निवड झालेली सानीका लेंगरे, ईश्वरी शिंदे, तनीषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.




यावेळी राजु चौरे सर, रमेश सरक सर, राजु गोरवे सर, पोतदार, सचिन गाटे यांनी सुत्रसंचालन केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng




This article had me hooked! For further reading, check out: DISCOVER MORE. What are your thoughts?