कु. श्रद्धा खरात हिचे कौतुकास्पद कार्य समाजातील मुलींना प्रेरणा देणारे आहे – बाळासाहेब सरगर
माळशिरस ( बारामती झटका )
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीमधून शालेय जीवनामध्ये कुस्ती क्षेत्रात उत्कृष्ट खेळ करून श्रद्धा खरात हिचे कार्य कौतुकास्पद असून समाजातील मुलींना प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी कु. श्रद्धा संतोष खरात हिने दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, युवा नेते लालासाहेब साळवे, संतोष खरात, सुनील बंडगर, अल्ताफ शिकलगार प्रवीण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
कु. श्रद्धा संतोष खरात माळशिरस प्रशाला माळशिरस येथे इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. तिने कुस्ती मल्लविद्या संकुल पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई या ठिकाणी राज्यस्तरीय कुस्त्यांचे आयोजन केलेले होते. सदर स्पर्धेमध्ये 12 वर्ष वयोगटात 40 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. श्रद्धा खरात हिला प्रथम क्रमांक मिळालेला असल्याने उत्तर प्रदेशातील हरिहर येथील नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली असल्याने भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा देण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित केलेला होता.
श्रद्धा खरात हिला वस्ताद ॲड. आप्पासाहेब वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळालेले आहे. शाळेतील प्राचार्य, क्रीडा शिक्षक व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. श्रद्धाचे आजी, आजोबा, आई, वडील, मित्र, मैत्रिणी यांचेही पाठबळ मिळत आहे. श्रद्धाने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळविलेला असल्याने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली असल्याने त्याही स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन केल्याबद्दल माळशिरस तालुक्यात श्रद्धा खरात हिचा गुणगौरव सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng