कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी संदीपभैया पाटील यांची निवड
माळशिरस (बारामती झटका)
कै. हणमंतराव (दादा) शंकरराव पाटील यांनी अहिल्यादेवी वि. वि. सेवा सोसायटीची स्थापना दि. १० एप्रिल १९६३ साली केली. माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे तसेच स्वस्त दरात धान्य उपलब्ध व्हावे, या हेतूने या संस्थेचा जन्म झाला. गेली अनेक वर्षे ही संस्था शेतकऱ्यांसाठी अविरतपणे काम करत आहे. सुरुवातीच्या काळात संस्थेचे चेअरमन पद कै. नारायणराव (आबा) पाटील यांनी अनेक वर्षे यशस्वीरित्या पूर्ण केले.
कै. हणमंतराव (दादा) पाटील यांच्यानंतर कै. शामदत्त (आण्णासाहेब) पाटील यांनी अहिल्यादेवी संस्थेची धुरा सांभाळली आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. अतिशय शांत स्वभावाचे आणि वेळ पडली तर तितकेच कडक आणि काटेकोर स्वभावाचे कै. श्यामदत्त पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात संस्थेचा कारभार खुप चांगल्या पद्धतीने चालवला आणि संस्थेचा विस्तार केला. अजातशत्रू अशा या व्यक्तिमत्वाला दि. २७ मे २००४ ला काळाने घाला घातला आणि पाटील परिवाराचा आणि अहिल्यादेवी सेवा संस्था परिवाराचा कधीही न भरुन येणारा असा तोटा झाला.
कै. श्यामदत्त पाटील यांच्या अचानक जाण्याने संदीपभैया पाटील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आली. एका बाजूला कुटुंब सांभाळायचे होते आणि दुसऱ्या बाजूला आपली संस्था. खरंतर इतक्या लहान वयात इतकी मोठी जबाबदारी पेलवणे हे सोपं काम नव्हतं. पण कोणत्याही संकटाला न डगमगता भैयासाहेबांनी सगळ्या जबाबदाऱ्या एकदम चोखपणे पार पडल्या. त्यांनी संस्थेचा कारभार २००५ पासून हातात घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत १८ वर्षे यशस्वीरित्या ते संस्थेचा विस्तार करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात यशस्वी घोडदौड करत संस्थेने स्वतःच्या मालकीची जागा पुणे-पंढरपूर रोड वर घेतली आणि संस्थेची २ मजली इमारत बांधली. तसेच संस्थेचे २ गोडाऊन आणि व्यापारी गाळे अशी मालमत्ता आहे, त्यामार्फत संस्थेला निधी उपलब्ध होतो.
संदीपभैयांच्या या १८ वर्षाच्या कार्याची पोचपावती म्हणूनच त्यांना सर्व सोसायटी मतदारांनी विक्रमी मतांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवडून दिले. संदीपभैया नवीन जबाबदारीसुद्धा चोखपणे पार पाडतील आणि आपल्या माळशिरसकरांना अभिमान वाटेल असं कार्य ते बाजार समितीमध्ये करतील. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतील आणि त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम ते नक्कीच करतील. संदीपभैय्यांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल पाटील परिवार माळशिरस तालुक्यातील सर्व सोसायटी संचालकांचा ऋणी आहे.
प्रशांत शामदत्त पाटील, मो. ९२७००८६००८
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great write-up! Your analysis is spot-on. For those wanting to explore more, this link is helpful: FIND OUT MORE. What are your thoughts?