केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सजावटीचे काम अंतिम टप्प्यात.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला झुकते माप अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळाच्या विस्तारवाढीत संधी मिळणार.
दिल्ली ( बारामती झटका )
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त ठरला आहे मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सजावटीचे काम सुरू असून अंतिम टप्प्यात आलेले आहे केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला झुकते माप आहे अनेक दिग्गजांना मंत्रिमंडळाच्या विस्तार वाडीत संधी मिळणार असून अनेक नवीन चेहरे मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट व राज्य मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
केंद्रीय राजकारणाला वेगळी कलाटणी देणारे राजकारण महाराष्ट्रात घडलेले आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळ्या वळणाची नांदी लागलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली असून त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप व राष्ट्रवादी अशी महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होत असताना केंद्रीय नेतृत्वाचा हस्तक्षेप असल्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनी मोठ्या प्रमाणात बंद केलेले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला झुकते माप मिळणार आहे शिवसेना व राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांचा समावेश असून मूळ भाजप मधील खासदारांचाही मंत्रिमंडळाच्या विस्तार वाढीत सहभाग राहणार आहे. आज रात्री किंवा उद्या मंत्रिमंडळाच्या विस्तार वाढीची घोषणा होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळामध्ये नव्याने शपथविधी घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप होणार आहे खाते वाटपामध्ये अनेक मंत्र्यांची खात्याची अदलाबदल होणार आहे तर काही मंत्र्यांना डच्चू मिळून नवीन मंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार वाढीचा मुहूर्त ठरलेला असल्याने अनेकांचे केंद्रातील व राज्यातील विस्तार वाढीकडे लक्ष लागलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng