केल्याने होत आहे रे ! आधी केलेची पाहिजे !! यशोगाथा
शब्दांकन – श्री. सतीश कुंडलिक कचरे, मंडळ कृषि अधिकारी, नातेपुते
नातेपुते (बारामती झटका)
राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत शेततळे अस्तरीकरण / आच्छादनाचे अर्थसहाय्याने अवर्षन प्रवन क्षेत्रमधील बळीराजा स्वयंनिर्भर व समृद्ध ची यशोगाथा मौजे पिंपरी येथील आजिनाथ शिवाजी कर्चे यांची इतर शेतकरी यांना प्रोत्साहन देणारी आहे. अजिनाथ शिवाजी कर्चे रा. पिंपरी, शंभो महादेव डोंगर रांगाच्या पायथ्याला मध्यम ते हलकी जमिन असून या जमिनीवर पिढ्यान पिढ्या शेती व शेतीवर आधारीत शेती व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून होता व आहे. अवर्षन प्रवन क्षेत्र व अशाश्वत प्रर्जन्यमानामुळे खरिप हाताला आला तर आला नाहीतर रब्बी हंगावर सर्व अवलंबून आसलेले शेती उत्पन्न व त्यावर जगण्याचा ताळमेळ कसातरी बसायचा व शेवटी हरभारे खाल्ले व हात कोरडे अशी परिस्थिती पाचवीला पुजलेली. महाराष्ट्र शासन कृषि विभाग मंडळ कृषि अधिकारी व कर्मचारी पिंपरी येथे एका शेतकरी प्रशिक्षणात भेट झाली व त्यावेळी परिस्थितीचे कथन केल्यानंतर उपलब्ध साधन सामुग्रीत परिस्थितीवर मात करून उभारी घेणेसाठी उपलब्ध पावसाचे पाणी जे वाहून जाते व पावसाळ्यात उपलब्ध होणारे विहीर व बोअर चे पाणी साठविणेसाठी मागेल त्याला शेततळे मधून केलेल्या शेततळे खोदाईला पाणी साठवन करणेसाठी महाडीबीटी मधून प्लॅस्टीक अस्तरीकरणाला अर्ज करून शासनाच्या अनुदानाचा लाभ घेणेबाबत सल्ला देण्यात आला.
या आधारे महाडीबीटी वरील अर्जाची निवड होऊन विहीत कागदपत्रे अपलोड अंती पूर्वसंमती ने प्लॅस्टीक आच्छादन पेपर खरेदी करून बसविण्यात आला. कृस सेवक लालासाहेब माने यांचा पाठपुरावा व कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांनी तत्काळ मोका तपासणीअंती प्लास्टिक अच्छादन ५० हजार आनुदान डीबीटीने जमा झाले. यशाची पहिली पायरी चढलो, शाश्वत संरक्षीत पाण्याची सोय झाली. पूर्वापार भाजीपाला पिकविणे, गावगावच्या आठवडी बाजारात विक्री करण्याचा पहिला व्यवसाय होताच त्यामुळे मध्यस्त आडत दलाल यांचे कमीशन, शेअर्सची बचत होत होती त्याचा फायदा झाला. उन्हाळी हंगामामध्ये शाश्वत पाणी व्यवस्थापनामुळे उन्हाळी टोमॅटो लागवड करावयाचे ठरले. कृषि विभाग सल्ल्याने उन्हाळी हंगामासाठी सिजेन्टा – ५७५ टी या जातीच्या ४ हजार रोपांची नोंदणी रोपवाटिकेकडे केली. दरम्यानचे काळात सेंद्रीय, कंपोस्ट खते जवळपास ४ ट्रेलर २० हजार जमिनीत मिसळून घेतले व ३ फुट रुंदीसह १०० फुट लांबीचे गादी वाफे तयार करून त्यामध्ये अमोनिअम सल्फेट १ पोते, सिगल सुपर फॉस्फेट २ पोती व सल्फेट ऑफ पोटॅश १ पोते गादीवाफ्यावर मिसळून घेतले व इनलाईन ठिंबक सिंचनसाठी साडेसात हजार खर्च करून संच कार्यान्वीत केला. नोंदणी केलीली ४ हजार रोपे प्रति रोप रु. २.३० प्रमाणे जागेवर प्राप्त झाली. त्याचा लागवड १.५ फुटावर एप्रिल पाडव्याच्या मुर्हूतावर केली. बांबुच्या कैच्या व सुतळीच्या साह्याने मांडव तयार करण्यात येऊन झाडाला आधार देण्यात आला. गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्ये २ हजार व रा. खते बेसल डोससह १० हजार खर्च झाला. किटकनाशके व रोगनाशके व ५ हजार खर्च करण्यात आला. माहे जून पहिल्या आठवड्यात टोमॅटो फळे विक्रीला उपलब्ध झाली . टोमॅटो ची काढणी दररोज आठवडा बाजार अकलुज, नातेपुते, सदाशिवनगर, फलटण व नातेपुते मंडईत करून प्रति किलो ५० रु. ते ९० रु. भाव मिळाला. अधिकचे होणारे टोमॅटो २ ते ३ दिवसाआड घाऊक बाजारात विकून प्रती कॅरेट १२ शे. ते १८ शे. भाव मिळाला. अशाप्रकारे १८ जुलै अखेर ७०० शे. कॅरेट १५ टन टोमॅटो उत्पादन झाले. सर्वसाधारणपणे प्रति झाड ३.५ ते ४ किलो उत्पादन आले. टोमॅटो ०.२० हे. क्षेत्राला सर्व खर्च ६५ हजार पर्यंत येऊन सर्व खर्च वजा जाता ५.१५ लाखाचे निव्वळ उत्पन्न प्राप्त झाले . टोमॅटो आणखीन १ महीना उत्पादन येणार असून २ टन पर्यंत उत्पादन अपेक्षीत आहे. हाच दर स्थिर राहीला तर १ लाख रुपये पर्यंत उत्पन्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मी श्री. अजिनाथ शिवाजी कर्चे कुटूंबासह पुण्याला जाऊन २५ हजाराची नोकरीचा निर्णय झाला होता. परंतू, एकदा प्रयत्नाती परमेश्वर म्हणून प्रयत्न केला व यशस्वी झाला. कृषि विभागाने दिलेला मौल्यवाण सल्ला, महिती व मार्गदर्शन, योजनाचा सहभाग, मिळालेले प्रोत्साहन व प्रोत्साहनपर अनुदान, स्वतःची व कुटुंबाची जिद्द, चिकाटी, कष्ट यामुळे हे साध्य झाले. मी या द्वारे आवाहन करू इच्छीतो की, कष्ट करण्याची तयारी, प्रयत्न, नियोजन, जिद्द, आत्मविश्वास व कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा सल्ला, मार्गदर्शन यामुळे शेती क्षेत्राचे यश उंबरट्यावर आहे. तरी खचून न जाता प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे, या उक्तीप्रमाणे यश स्वयंनिर्भरता स्वयंपूर्णता शाश्वत शक्य आहे.
जय किसान ! जय विज्ञान ! जय सहकार ! – अजिनाथ शिवाजी कर्चे
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
This piece provided a lot of food for thought. It was well-written and very informative. Let’s chat more about it. Feel free to visit my profile for more related content.