चि.सौ.कां. नम्रता चवरे पाटील आणि चि. मंदार दगडे पाटील यांचा शाही विवाहसोहळा होणार संपन्न
श्री. हणमंतराव चवरे पाटील यांची कन्या आणि श्री. डॉ. वसंतराव दगडे पाटील यांचे चिरंजीव यांचा शुभविवाह होणार
सातारा (बारामती झटका)
श्री. बाबासाहेब मल्हारी चवरे पाटील यांची नात व श्री. हनुमंतराव बाबासाहेब चवरे पाटील रा. खंडोबाचीवाडी (गोवे) ता. जि. सातारा यांची सुकन्या चि.सौ.कां.डॉ. नम्रता M.B.B.S., M.D. (Medicine) आणि डॉ. वसंतराव रामराव दगडे पाटील रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे यांचे चिरंजीव डॉ. मंदार M.B.B.S., M.D. (Medicine) यांचा शुभविवाह शुक्रवार दि. ०८/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०६.५८ मि. या गोरज शुभ मुहूर्तावर देविका द प्राईड डेस्टिनेशन वाढे, लोणंद-सातारा रोड सातारा येथे संपन्न होणार आहे.



लग्न सोहळ्याचे आपणांस हस्ते पर हस्ते आमंत्रण निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला आहे. लग्नाच्या घाईगडबडीत नजरचुकीने आपणांस आमंत्रण देण्यास विसरले असल्यास अथवा राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन निमंत्रक श्री. बाबासाहेब मल्हारी चवरे (पाटील), श्री. हनुमंतराव बाबासाहेब चवरे (पाटील), श्री. गजानन बाबासाहेब चवरे (पाटील) आणि समस्त चवरे पाटील यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
