कलाकारांची नेत्यांना वगळून लवकरच बैठक संपन्न होणार – भारुडसम्राट ह. भ. प. ब्रह्मदेव केंगार महाराज

मांडवे (बारामती झटका)
गेली 30-35 वर्षे अनेक संघटनांमध्ये आपापल्या पद्धतीने अनेक कलाकार वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करीत आहेत. पण प्रत्येक संघटना कलाकारांचा वापर करून घेत आहे. यासाठी लवकरच नेत्यांना वगळून कलाकारांची स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे भारुडसम्राट ह. भ. प. श्री. ब्रह्मदेव केंगार महाराज यांनी बारामती झटकाशी बोलताना सांगितले.
भारुडसम्राट ह. भ. प. श्री. ब्रह्मदेव केंगार महाराज पुढे बोलताना म्हणाले, महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात व माळशिरस तालुक्यामध्ये अनेक कलाकार आहेत. कलाकारांचा राजकारणी नेत्यांनी वापर करून घेतलेला आहे. यासाठी कलाकारांचीच संघटना उभा करण्याचा मानस आहे. जिल्ह्यात व तालुक्यात कलाकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कलाकारांच्या बैठकीमध्ये कोणत्याही नेता कार्यकर्ता यांना न बोलविता फक्त कलाकारांची बैठक संपन्न होणार असल्याचे सांगितले.


भारुडसम्राट ह. भ. प. श्री. ब्रह्मदेव केंगार महाराज यांनी ह. भ. प. श्री. लालासाहेब गेजगे महाराज, ह. भ. प. श्री. अजिनाथ पारसे महाराज, श्री. राजाभाऊ नामदास, श्री. तुकाराम कांबळे, श्री. पिंटू पारसे, श्री. विलास बिरलिंगे यांच्यासह अनेक कलाकारांच्या भेटी घेतलेल्या आहेत. लवकरच कलाकारांची बैठक माळशिरस तालुक्यात संपन्न होणार आहे. तरी तालुक्यातील कलाकारांनी भारुडसम्राट ह. भ. प. श्री. ब्रह्मदेव केंगार महाराज यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



