क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा चेंडू व बॅटवर ताबा तसाच, सचिन थोरात यांचा अभ्यास व मार्कावर ताबा…
अकलूज (बारामती झटका)
क्रिकेटच्या विश्वामध्ये अनेकांनी करिअर केली. त्यामध्ये कमी वयात सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम चेंडू व बॅटवर ताबा मिळवून केलेले आहेत. तसाच प्रकार रात्र प्रशाला अकलूज येथील सचिन संजय थोरात, रा. अकलूज या तरुणाने दहावीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयात पस्तीस टक्के गुण मिळवून अभ्यास व मार्कावर ताबा मिळवलेला आहे.
सौ. सुनीता व श्री. संजय थोरात यांचा सचिन अकलूज येथील रात्र प्रशाला, अकलूज शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या शाळेत शिकत होता. सचिन याने 2023 मध्ये एसएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन वेगळा विक्रम निर्माण केलेला आहे. अनेक विद्यार्थी अगदी शंभर टक्के किंवा शंभर मार्क एखाद्या विषयात घेत असतात मात्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, मॅथेमॅटिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सोशल सायन्स या सर्व विषयांमध्ये 35 मार्क घेऊन पस्तीस टक्के उत्तीर्ण होण्याकरता कितीतरी लिखाण करीत असताना मार्मिक पद्धतीने लिखाण करावे लागणार आहे.

आई-वडिलांचे स्वप्न असतं मुलगा पास व्हावा आणि मुलाचं समाजामध्ये आपलं काहीतरी वेगळं असावं. दोन्हीही उद्देश सचिन थोरात यांनी साध्य केलेले आहेत. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने चेंडू व बॅटवर ताबा मिळवून क्रिकेट विश्वामध्ये आपले नाव कोरलेले आहे. त्याचप्रमाणे सचिन थोरात यांनी सुद्धा मोजकाच अभ्यास करून पाहिजे तेवढे मार्क मिळवण्यामध्ये यशस्वी झालेले असल्याने मित्रपरिवार व नातेवाईक यांच्यामधून सचिन थोरात यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng