ताज्या बातम्याराजकारण

होलार समाजातील युवकांची होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेला सर्वाधिक पसंती….

राज्यभरातील नांदेड, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तरुणांनी केली सदस्य नोंदणी

माळशिरस (बारामती झटका)

रविवार दि. १६/०७/२०२३ रोजी होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेची बैठक माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. यावेळी सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांनी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांच्या नेतृत्वाखाली होलार समाजाचे युवा नेतृत्व महाराष्ट्राचा बुलंद आवाज युवा योद्धा सेवकभाऊ अहिवळे (बारामती), हसतमुख चेहऱ्याने आपल्या बोलीभाषातून होलार समाजाला आपलंस करून घेणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन होलार समाजाचा प्रचार करणारे स्टार प्रचारक हनुमंत केंगार (वालचंदनगर), होलार समाज चळवळीचे अभ्यासक अनिल भाऊ केंगार (वालचंदनगर), सोलापूर शहरावर अधीराज्य गाजवणारे होलार समाजातील वांजळे म्हणजे सचिनभाऊ हेगडे (सोलापूर), बुद्ध-शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीच्या अभ्यासक संविधानाच्या विचाराचे पाईक भल्या भल्यांना घाम फोडणारे महिंद्र गोरे (फलटण), होलार समाजाचे चळवळीमध्ये सतत हजर असणारे आनंद अहिवळे (सोलापुर), हनुमंत केंगार (टेंभूर्णी) अशा अनेक युवा कार्यकर्त्यांनी होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेत प्रवेश केला.

बैठकीच्या सुरूवातीस होलार समाजाचे जेष्ठ नेते कै राजाभाऊ माने सातारा यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांच्या पवित्र स्मुतीस श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सध्या होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेनी वर्षभरात केलेली काम बघून महाराष्ट्रातील समाजामध्ये खूप सकारात्मक संदेश समाजामध्ये पोहचला आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांनी संघटनेमध्ये सदस्य नोंदणी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. तसेच होलार समाज यंग ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून सर्व युवकांनी महाराष्ट्रामध्ये समाज परिवर्तन घडवून आणायचे आहे. यासाठी युवकांनी पुढे येऊन काम केले पाहिजे .

सेवक अहिवळे, हनुमंत केंगार, महेंद्र गोरे, अनिल केंगार यांनी मनोगत व्यक्त करताना होलार समाजापुढे असंख्य अडचणी आहेत . त्या दूर करण्याचे आणि समाजाला न्याय देण्याचे काम सर्व युवकांनी एकत्र येऊन करायचे आहे, असे सांगितले.

यावेळी होलार समाज यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते माळशिरस तालुका मार्गदर्शक नेते मल्हारी करडे, मार्गदर्शक नेते आश्वासन गोरवे, अध्यक्ष सुहास बिरलिंगे साहेब, उपाध्यक्ष मोहन करडे सर, उपाध्यक्ष नाथा व पारसे, कार्याध्यक्ष सागर भाऊ पारसे, उपाध्यक्ष गोविंद अहिवळे, तुकाराम होनमाने, सचिव दादासाहेब करडे, सहसचिव सचिन हेगडे, बापूसाहेब करडे आदी माळशिरस तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort