खंडाळी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी तिरंगी लढत
खंडाळी (बारामती झटका)
खंडाळी-दत्तनगर ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला रंगत आली असून सरपंच पद हे अनुसुचित जाती (SC) स्त्री राखीव असून सौ. सुनीता सुरवसे, सौ. सारिका कटके, सौ. मोनाली खंडागळे या तिघींमध्ये लढत आहे. खंडाळी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रथमच दोन पॅनल स. म. शंकरराव मोहिते पाटील प्रणित समविचारी ग्रामविकास आघाडी व श्रीनाथ पॅनल आहेत. या दोन्ही पॅनलने सहा वार्ड मधून १७-१७ उमेदवार ग्रामपंचायत सदस्यासाठी उभे केले आहेत. तर समर्थ भोलेनाथ ग्रामविकास पॅनलने ५ उमेदवार ग्रा. पं. स. साठी उभे केले आहेत.
विद्यमान सरपंच बाबुराव पताळे यांच्या श्रीनाथ पॅनलमधून सरपंच पदासाठी सारिका कटके तर माजी सरपंच हरिदास भोसले, दत्तात्रय रिसवडकर, माजी उपसरपंच – सुभाष गांधी अशोक तात्या पताळे, महादेव साबळे यांच्या समविचारी ग्रामविकास आघाडीमधून सौ. सुनिता सुरवसे यांच्यात चुरशीची लढत असली तरी शहाजीआप्पा पताळे यांच्या समर्थ भोलेनाथ ग्रामविकास पॅनलच्या सौ. मोनाली खंडागळे उभ्या आहेत.
शक्ती प्रदर्शन करत मंदिरांमध्ये श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला. पदयात्रा काढण्यात आल्या. होम टू होम प्रचार कार्यकर्ते व उमेदवार करत असले तरी सरपंच बाबुराव पताळे यांच्या प्रतिष्ठेची ही २०२२ ची निवडणूक असून त्यांच्या श्रीनाथ पॅनलसमोर समविचारी ग्रामविकास आघाडीचे मोठे आव्हान आहे. माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या खंडाळी ग्रामपंचायतीसाठी ६ वॉर्ड मधुन ५,९०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng