खडकी येथील स्व. शुभदा देशपांडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन
खडकी (बारामती झटका)
खडकी ता. तुळजापूर येथील माजी सरपंच, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाहूराज उर्फ गोविंद देशपांडे यांच्या सुविद्य पत्नी स्वर्गीय शुभदा शाहुराज देशपांडे यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि. १५/६/२०२३ रोजी होणार आहे.
स्वर्गीय शुभदा देशपांडे यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९५२ रोजी केशर जवळगा, ता. उमरगा, जि उस्मानाबाद येथे झाला होता. त्यांचा विवाह देशपांडे यांच्याशी झाला होता. त्यांना पद्मजा, दिपाली आणि शुभांगी या तीन मुली. तीनही मुली उच्चशिक्षित असून सौ. पद्मजा स्त्रीरोगतज्ञ असून त्यांचे पती डॉक्टर आहेत. सौ दिपाली इंजिनिअर असून त्यांचे पती देखील इंजिनियर आहेत तर सौ. शुभांगी ते दोघे पती-पत्नी इंजिनियर आहेत.
कै. शुभदा देशपांडे यांनी देशपांडे आणि देशमुख परिवाराच्या प्रगतीसाठी खूप कष्ट घेतले. मुलींच्या शिक्षणासह कुटुंबाच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचा अत्यंत स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांनी अनेक माणसे जोडली. त्यांनी जीवनाच्या शेवटपर्यंत शाहूराज देशपांडे महाराज यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात समर्थ साथ दिली. त्यामुळेच शाहूराज देशपांडे महाराज यांनी अनेक वर्ष खडकी गावचे सरपंच म्हणून पद भूषवले व जनतेची सेवा केली. ते आजही करत आहे.
जानेवारी २०२२ मध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्या पुणे येथे आपल्या मुलीकडे गेल्या होत्या. कोरोनाच्या महाभयंकर आजारातून त्या पूर्णपणे बरा झाल्या होत्या परंतु दि. २६ जून २०२२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बघता बघता त्यांना आता एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचे दि. १५/६/२०२३ रोजी प्रथम पुण्यस्मरण होत आहे. सदर पुण्यस्मरणास उपस्थित राहण्याचे आवाहन देशपांडे आणि देशमुख परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Insightful read! Your analysis is spot-on. For more detailed information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!