गणेश उत्सवामध्ये श्रीगणेशाचा अधिकाधिक नामजप करा – ह.भ.प. मनोहर महाराज भगत
नातेपुते ( बारामती झटका)
!!! गणपती बाप्पा मोरया !!
वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा !!
कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण श्रीगणेश पुजनाने करतो. गणेशाचे बालरूप जितके मनमोहक आहे, तितकेच त्याची शक्ती, मुक्ती, विवेकबुद्धी चतुर आहे. गणपती केवळ विघ्नहर्ता नाही तर, तो बुद्धीदाता आणि समृद्धीकारक ही आहे.
चातुर्मासातील दुसरा महिना भाद्रपद महिना हा मुख्य करून गणपती पूजनासाठी प्रसिध्द आहे. भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्राचीन काळापासून परंपरा आहे.
यंदा बुधवार दि. ३१ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. प्रत्येकांच्या घरी आपल्या आवडीनुसार मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते आणि श्रीगणेश पूजन केले जाते. ही आचरण भक्ती मानली जाते. कर्मकांडापेक्षा उपासनाकांड श्रेष्ठ आहे. गणेशाची उपासना करत असताना ॐ गणपते नमः, ॐ गणपते नमः हा नाम जप अधिकधिक वेळा करावा, असे आव्हान ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. मनोहर महाराज भगत, नातेपुते यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने केले आहे.
गणेशाचे नामस्मरण हेच गणपती बाप्पाच्या जवळ जाण्याचे प्रवेशद्वार आहे. गणेशाच्या केवळ नाम उच्चाराने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. बुद्धीदाता सर्व गणाचा अधिपती सुखकर्ता, दुखहर्ता, विघ्नहर्ता, वरदविनायक अशा कितीतरी वरदानाने प्रसिद्ध असलेले श्रीगणेशाचे घरोघरी नामस्मरण, उपासना पूजा करा. ही गणेश चतुर्थी मांगल्याची पर्वणी पवित्र मंगल नामस्मरणाची संधी आहे.
गणेश पूजनाचे व नामजपाची परंपरा वैदिक काळापासून आहे. पृथ्वी, आकाश, तेज, वायू, जल या सर्वांचा पती म्हणजे गणपती. अगदी लहानपणी पहिल्यांदा शिक्षणाचा प्रारंभ होतो तो श्रीगणेशाने होतो. गणपती म्हणजे कोट्यावधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. गणेशाचा उल्लेख चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराणांसह अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. गणेशाचे चरण हे कमलपात्राप्रमाणे असून, नाभी खोल तर पोट लांब आहे. गणेशाची छाती अत्यंत विशाल असून, चार हात धर्म, अर्थ, काम व मोक्ष आहेत. एक दात आणि सोंड सगळ्या पापाचे हरण करत आहे. अत्यंत सुंदर डोळे, मोकळे कान व शीर्ष सौंदर्याने नटलेले आहे. गणेशाच्या गुणगानाने, नामजपाने अज्ञानी माणुस सुध्दा ज्ञानी होतो, असे ह.भ.प. मनोहर भगत महाराज यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Complementing such group-level analyses with longitudinal idiographic studies is likely to contribute important information.
Always follow proper dosage instructions when you stromectol south africa from internet suppliers at unbeatably low prices
Gestational diabetes occurs during pregnancy and affects about 18 percent of all pregnancies, according to the American Diabetes Association.