Uncategorizedआरोग्यताज्या बातम्या

गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे राज्यात दरवर्षी ७० हजार महिला मृत्यूमुखी पडतात – डॉ. श्रद्धा जवंजाळ

उपाययोजना करणे काळाची गरज…

करमाळा (बारामती झटका)

गर्भाशयाचा कॅन्सर हा मोठा आजार सध्या महिलांमध्ये दिसून येत असून याला प्रतिबंध करणारी लस उपलब्ध असून ही लस घेतली तर ९९ टक्के महिला या आजारापासून दूर राहू शकतात. त्यासाठी या लसीकरणाची गरज आहे, असे मत गर्भाशयाच्या कॅन्सरवर संपूर्ण देशात जनजागृती करणाऱ्या डॉ. श्रद्धा जवजाळ यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गर्भाशयाच्या कॅन्सरवर प्रतिबंध करणाऱ्या लसीसाठी इच्छुक असणाऱ्या महिलांची नोंदणी करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

२७० महिलांनी यात नोंदणी केली असून या महिलांना पुढील महिन्यात लस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्यकारी प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. कविता कांबळे, शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष प्रियंका गायकवाड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

पुढे बोलताना डॉ. श्रद्धा जवंजाळ म्हणाल्या की, राज्यात दरवर्षी ७० हजार महिला गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडतात. प्रतिबंध करणारी लस आहे. विशेषतः सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणींनी, स्त्रियांनी ही लस घेणे गरजेचे आहे. प्रतिबंधक लसची किंमत चार हजार रुपये आहे. मात्र ही लस या शिबिरात मोफत देण्यात येत आहे. करमाळा शहरातील, तालुक्यातील महिलांनी या संदर्भात सजग राहून महिलांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त महिलांनी लस घेण्यासाठी नोंदणी करावी.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अनेक उपक्रम घेऊन आरोग्याच्या संदर्भात दक्ष आहे. बार्शी येथील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे मोफत कॅन्सरवरचे उपचार केले जातात. फक्त लोकांना माहिती नसल्यामुळे सेवा मिळत नाही, यामुळे सर्वांनी यासाठी प्रयत्न करावेत. विशेषत: कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनी ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. करमाळ्यातील अकरावीतील मुलगी अमृता लावंड तिने जवळपास ६२ महिलांना प्रबोधन करून ही लस घेण्यास प्रवृत्त केले व त्यांची नाव नोंदणी केली. या तिच्या उपक्रमाबद्दल बद्दल डॉ. श्रद्धा जवंजाळळ यांनी त्यांचा सत्कार केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Back to top button