Uncategorized

गायरान अतिक्रमण कार्यवाही विरोधात भंडीशेगाव येथे रस्ता रोको आंदोलन

पंढरपूर (बारामती झटका)

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सोलापूर येथील जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या आदेशाविरुद्ध ग्रामपंचायत भंडीशेगाव (ता.पंढरपूर) यांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलन स्थळी प्रथम संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे व मेजर कुणालगीर गोसावी यांच्या प्रतिमांचे पूजन करून रस्ता रोको आंदोलनास सुरुवात करण्यात आली.

भंडीशेगाव मधील साडेपाचशे कुटुंबातील सदस्य या कार्यवाहीमुळे बाधित होणार आहेत. या गायरान जमिनिवरती गोरगरीब, कामगार, भटके विमुक्त व मागासवर्गीय लोकांनी घरकुल बांधली आहेत. तसेच या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते, गटार, लाईट तसेच पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकून करोडो रुपये खर्च केला आहे. त्याचप्रमाणे या गायरान जागेवर सरकारी इमारती बांधल्या आहेत. या गायरान जमिनिवरती लोक मागील पन्नास, साठ वर्षांपासून वास्तव्यास आहेत आणि अचानक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जात आहे. या सर्व कार्यवाही विरोधात सर्व ग्रामस्थ, सर्व पक्षीय रस्ता रोको करत असल्याची माहिती सरपंच मनीषा येलमार यांनी दिली.

यावेळी सरपंच मनीषा येलमार, पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी कोळवले, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाभाऊ माने, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक गंगाराम विभूते, माजी उपसरपंच संतोष ननवरे, उपसरपंच विजय पाटील, नवनाथ माने, रमेश शेगावकर, रामहरी येलमार, संतोष येलमार, विश्वास सुरवसे, समाधान सुरवसे, सतीश रणखांबे, संजय रणखांबे, डॉ. श्रीधर येलमार, महेंद्र येलपले, मंडळ अधिकारी दीपक शिंदे व पोलीस कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button