गिरझणीचे माजी सरपंच भरत वाघ यांचे निधन.
अकलूज (बारामती झटका)
गिरझणी ता. माळशिरस येथील माजी सरपंच व उत्कृष्ट मल्ल म्हणुन परिचित असलेले भरत साहेबराव वाघ यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. गिरझणी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गिरझणी गावच्या राजकारणात अनेक वर्ष त्यांचे वर्चस्व होते. तसेच लाल मातीतील उत्कृष्ट मल्ल म्हणुनही त्यांची ख्याती होती. सहकार महर्षी कारखान्याचे संचालक म्हणुनही त्यांनी काम पाहीले. गिरझणी गावचे सरपंच म्हणुन त्यांनी अनेक वर्ष काम केले. त्यांच्या दुःखद निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
परमेश्वर वाघ परीवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो व स्व. भरत वाघ यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परीवाराच्या वतीने आदरांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
tupaiwin tupaiwin