गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्याची बुलंद आवाजाची तोफ धडाडणार…
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यावर गुजरातमधील दानीलिमडा मतदार संघाच्या प्रचाराची जबाबदारी
नवी दिल्ली ( बारामती झटका )
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चूग यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे गुजरात राज्यातील दानीलिमडा मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी दिलेली असल्याने गुजरात राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्याची बुलंद आवाजाची तोफ धडाडणार आहे.
गुजरात राज्यात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये खात्रीशीर विजयाचे लक्ष प्राप्त करण्याच्या उद्देशाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री संगटन यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रीय नेते, पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी यांचा नियोजित दौरा विधानसभा मतदार संघात होणार आहे.
दि. 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2022 पर्यंत आपणाकडे मतदार संघाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली असल्याचे पत्र राष्ट्रीय महामंत्री तरुण चूग त्यांनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना दिलेले आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी मापसा मतदार संघाची प्रभारी जबाबदारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली होती, ती यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर जवळील दानीलिमडा मतदार संघाची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे दिलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Very well written! The insights provided are very valuable. For additional information, check out: LEARN MORE. Looking forward to the discussion!