गुरसाळे येथील प्रगतशील बागायतदार विठोबा धोंडीबा शेळके यांचे दुःखद निधन..
उद्योजक दत्तात्रय विठोबा शेळके यांना पितृशोक.
नातेपुते (बारामती झटका)
गुरसाळे ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार विठोबा धोंडीबा शेळके यांचे वयाच्या 86 व्या वर्षी शुक्रवार दि. 01/09/2023 वार्धक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, तीन मुले अण्णा, दत्तात्रय ज्ञानेश्वर व एक मुलगी सखुताई शरद नरूटे यांच्यासह नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर धर्मपुरी बंगला ते गुरसाळे रोडवर, शेळके वस्ती येथे राहत्या निवासस्थाना शेजारी शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहे.
विठोबा धोंडीबा शेळके यांचे मूळ गाव मार्डी आहे. दुष्काळी भाग असल्याने उदरनिर्वाहाकरता कार्पोरेशनच्या ऊस मळ्यामध्ये कामाला आलेले होते. त्यांचा शांताबाई यांच्याशी विवाह झालेला होता. गरीबी व प्रतिकूल परिस्थिती, दोघेही अशिक्षित असूनही जिद्द, चिकाटी व कष्ट करण्याची त्यांची तयारी होती. त्यांनी अण्णा यांना सोबत घेतले तर दत्तात्रय व ज्ञानेश्वर यांना शाळेत पाठवून उच्च शिक्षण देण्याचा मानस केलेला होता. दत्तात्रय व ज्ञानेश्वर यांनी गरीब परिस्थिती यावर मात करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे समजून दोघांनी शिक्षणामध्ये लक्ष देऊन दोघेही इंजिनीयर झालेले आहेत. नोकरी न करता उद्योग व्यवसायामध्ये लक्ष दिले. पुण्यासारख्या शहरांमध्ये शेळके परिवार यांचे उद्योग व्यवसाय सुरू आहेत. उद्योग व्यवसायामुळे आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. शेळके परिवार यांनी शेतजमीन, घर, जागा खरेदी केलेली आहेत. विठोबा शेळके यांची नातवंडे सुद्धा उच्च शिक्षित झालेले आहेत.
अशा सुसंस्कृत शेळके परिवाराने दिवसेंदिवस उद्योग, व्यवसाय व सामाजिक कार्यातून समाजामध्ये नावलौकिक मिळविलेला आहे. उद्योग, व्यवसाय व सामाजिक कार्याबरोबर राजकारणामध्ये सुद्धा शेळके परिवारामधील सौ. संगीता दत्तात्रय शेळके यांनी माळशिरस पंचायत समिती सदस्य पदावर पाच वर्ष काम केलेले आहे. ज्या परिसरामध्ये आई-वडिलांनी काबाडकष्ट केले त्याच परिसरात मुले शेती, घर, जागा घेऊन वास्तव्यास आहेत.
विठोबा शेळके यांच्या दुःखद निधनाने शेळके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. स्व. विठोबा शेळके यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व शेळके परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण श्रद्धांजली आहे. स्वर्गीय विठोबा शेळके यांच्या रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा कार्यक्रम) रविवार दि. 03/09/2023 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng