गुरुकृपा उद्योग समूहाचे उद्योजक राजाभाऊ महाडिक पाटील अनंतात विलीन झाले.
उद्योग व्यवसायामध्ये महाडिक पाटील परिवार यांची समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
अकलूज (बारामती झटका)
अकलूज ता. माळशिरस येथील गुरुकृपा उद्योग समूहाचे उद्योजक राजेश उर्फ राजाभाऊ महाडिक पाटील यांचे वयाच्या 49 व्या वर्षी राहत्या घरी गुरुवार दि. 20 जुलै 2023 रोजी सकाळी साडेदहा वाजता दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्यावर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व उद्योग व्यवसायीक, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाडिक पाटील परिवार यांनी समाजामध्ये उद्योग व्यवसायातून वेगळी ओळख निर्माण केलेली होती. गुरुकृपा उद्योग समूह या नावाने सर्व उद्योग व्यवसाय आहेत. मंगल कार्यालय, मोबाईल शॉपी, किराणा दुकान, भांडी, फर्निचर असे उद्योग व्यवसाय आहेत. संपूर्ण महाडिक पाटील परिवाराचा सोज्वळ व सुसंस्कृत स्वभाव असल्याने समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गुरुकृपा किराणा दुकान गेली अनेक वर्ष अकलूज येथे सुरू होते. कालांतराने उद्योग व्यवसाय वाढवले. फर्निचर, सोफा सेट, कपाट, टेबल, खुर्च्या असे साहित्य बनविण्याचा कारखाना सुरू केलेला होता. लग्न बस्त्यासाठी लागणारे भांडी व इतर साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने अनेकांच्या मुलामुलींच्या विवाहासाठी दररोज कितीतरी लग्नाचे साहित्य जात होते.
आण्णांचा मंगल कार्यालय या ठिकाणी गोरगरिबांना फायदा होत असे. अण्णांनी माणुसकी जपली. आपल्या मुलांनासुद्धा तीच शिकवण दिलेली असल्याने राजाभाऊ व गणेश काका यांनीही समाजामध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवलेली होती. आयुष्यामध्ये कधीच कोणाला अपशब्द तोंडातून परिवारातील कोणीच काढलेला नाही. सांप्रदायिक व धार्मिक घराणे होते.
राजाभाऊ आणि गणेश काका राम-लक्ष्मणासारखी जोडी होती. राजाभाऊ यांच्या अकाली दुःखद निधनाने मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या मधून हळहळ व्यक्त केली जात होती. राजाभाऊ यांच्या गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ असल्याने हरिनामाच्या जयघोषाने अकलूज येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रा अकलाई स्मशान भूमीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात करण्यात आली. मुखाग्नी मुलाने दिला. त्यावेळी सांप्रदायिक वारकरी यांनी यांनी ‘आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा, श्रीरंग बोलवितो अंतकाळी, विठो आम्हासी पावला, कुडीसहित झाला गुप्त तुका’ या अभंगाने शेवट करून आरती करण्यात आली.
स्वर्गीय राजाभाऊ महाडिक पाटील यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवारी 22 जुलै 2023 रोजी सकाळी सात वाजता अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे होणार आहे. स्वर्गीय राजाभाऊ यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व महाडिक पाटील परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng