गुरुजनांचा सन्मान करणे आपले कर्तव्य – विलासराव गाढवे

इंदापूर (बारामती सटका)
सर्व गुरुजन ज्ञानदानाचे काम योग्य प्रकारे करत आहात. त्याबद्दल आपल्या विद्यालयातील सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. साप्ताहिक लक्ष्मी वैभवचे संपादक विलासराव गाढवे व साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादक धनंजय कळमकर या दोन्ही साप्ताहिकांतर्फे सर्व गुरुजनांना छोटीशी भेट म्हणून भिंतीवरील घड्याळ व दिनदर्शिका भेट देण्यात आली.
यावेळेस माजी सैनिक विलासराव गाढवे म्हणाले की, पौराणिक मान्यतेनुसार गुरुपौर्णिमा हा महाभारताचे लेखक वेद व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. त्यांच्या सन्मानार्थ या दिवसाला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरु पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांनी चारही वेदांची रचना केली आणि म्हणूनच त्यांना वेदव्यास असे नाव पडले.
यावेळी विकास फलफले मुख्याध्यापक, सुनील माळी, शंकर हुबाले, चंद्रकांत काळे, कालिदास मोरे, गोरु मेंगाळ, जयश्री झगडे, वर्षा कचरे, शीतल जाधव, स्वाती पडळकर, रवींद्र माने आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng