गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास साधला – आ. रणजितसिंह मोहिते पाटील.
अकलूज (बारामती झटका)
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला यशस्वीरीत्या ९ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून “मोदी@9” जनसंपर्क अभियाना अंतर्गत माढा विधानसभा क्षेत्रात श्रीपुर येथे पत्रकार परिषद घेऊन मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ९ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी केलेल्या कार्याचा, विविध योजनांचा लेखाजोखा माढा विधानसभा प्रमुख विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मांडला.
यावेळी बोलताना आ. मोहिते पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 9 वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगितला. देशात शेतकऱ्यांसाठी पी. एम. किसान योजना, युवकांसाठी रोजगार योजना, विविध प्रकारच्या कर्ज योजना, राबविल्या. महिलांसाठी मोफत उज्वला गॅस योजना प्रभाविपणे राबविली. देशभरात स्वस्त जनऔषधी योजना राबवून 9300 दुकाने सुरु केली. अन्नधान्य योजनेच्या माध्यमातून मोफत रेशन उपलब्ध करून दिले. पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली. जागतिक दर्जाची अत्याधुनिक रेल्वे वंदे भारत सुरु केली. गेल्या 9 वर्षात 74 विमानतळावरून 144 विमान तळाची निर्मिती केली. वैद्यकीय महाविद्यालय सुरु केली. महिलांसाठी अवघ्या 1 रुपये मध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले. तसेच कोविड महामारीच्या काळात मैत्रीच्या माध्यमातून 100 पेक्षा अधीक देशात लस पाठविली.

आयुष्यमान भारत योजना, जनधन योजना, मुद्रा कर्ज, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, भारत नेट प्रोजेक्ट राष्ट्रीय महामार्ग योजना, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना,111 जलमार्ग निर्माण केले. 5 शहरापासून 20 शहरात मेट्रो सेवा सुरु केली. देशातील खेळांना प्रोत्साहन दिले, आंतरराष्ट्रीय योग दिन, सौर आघाडी, भरडधान्य आदी नवीन उपक्रम सुरु केले. तसेच 370 कलम रद्द केले. देशाची निर्यात क्षमता 750 पटीहुन अधीक वाढविली.
या माध्यमातून गेल्या 9 वर्षात सर्वांगीण विकास साधला असल्याचे आ. मोहिते पाटील यांनी सांगितले. तसेच या महासंपर्क अभियानाअंतर्गत माढा विधानसभा क्षेत्रात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देवुन केंद्र सरकार व राज्य सरकार करत असलेल्या लोकाभिमुख विकास कार्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे पत्रकार बंधुंना आवाहन केले. तसेच पत्रकार बंधुंनी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा संदीप घाडगे यांनी सन्मान केला.
यावेळी प्रिंट, इलेकक्ट्राॅनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, माढा मंडलाचे अध्यक्ष योगेश बोबडे, माळशिरस मंडलाचे अध्यक्ष बाजीराव काटकर, अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, पत्रकार परिषद कार्यक्रम प्रमुख अमरसिंह शेंडे, सचिव भा.ज.पा (सोलापूर जिल्हा) जलतज्ञ अनिल पाटील, महिला आघाडी अध्यक्षा कल्पना कुलकर्णी, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती प्रतापराव पाटील, सदस्य अनिल जाधव यांचेसह पक्षाचे, विविध आघाड्यांचे, मोर्चाचे पदाधिकारी, संयोजक, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng