रास्त भाव धान्य दुकानामार्फत शिधाजिन्नस संचाचे वाटप – तहसीलदार जगदीश निंबाळकर
१ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नसांचा समावेश
माळशिरस (बारामती झटका)
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांच्याकडील दि. ४ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिका धारकांना दिवाळीनिमित्त ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या शिधाजिन्नस संचाचे वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्यातील अंतोदय अन्न योजनेतील ८९३७ पिवळ्या शिधाधारकांना व प्राधान्य कुटुंब (बीपीएल पिवळ्या व अन्न सुरक्षा योजनेत पात्र असणारे केसरी शिधा धारकांना) ४७,५८६ शिधापत्रिका धारकांना दिवाळीनिमित्त १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधाजिन्नस समावेश असलेल्या १ शिधाजिन्नस संच वाटप करण्यात येणार असून माळशिरस तालुक्यातील अंतोदय व अन्नसुरक्षा असे एकूण ५६,५२३ कार्डधारकांना प्रति कार्ड एक शिधाजिन्नस संच रुपये १००/- दराने दिवाळीपूर्वी रास्त भाव धान्य दुकानामार्फत वाटप करण्यात येणार असल्याचे तहसीलदार माळशिरस जगदीश निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप, पुरवठा विभागाचे केमकर, लोखंडे आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

