Uncategorized

गोरडवाडी गावच्या बिनविरोध सरपंच पदी पांडुरंग पिसे यांची वर्णी लागणार….

हत्ती, घोडे, झांज पथक, बॅन्जो, लेझीम, गजी ढोल, हलगी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत भव्य मिरवणूक निघणार…

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजयराव निवृत्ती गोरड यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी बिनविरोध पांडुरंग पिसे यांची वर्णी लागणार आहे. सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर हत्ती, घोडे, झांज पथक, बेंजो, लेझीम, गजी ढोल, हलगी, फटाक्यांची आतिशबाजी व गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढून गोरडवाडीचे ग्रामदैवत बिरोबा व सर्व देवांचा आशीर्वाद घेऊन ग्रामस्थांच्या व मित्र परिवारांच्या उपस्थितीत नेत्रदीपक सोहळा होणार आहे.

गोरडवाडीचे सरपंच विजयराव गोरडे यांनी माळशिरस पंचायत समितीमधील सहाय्यक प्रशासन अधिकारी बी. एच. कदम व सहाय्यक श्री. एस. टी. खडतरे यांच्याकडे राजीनामा दिलेला होता. यावेळी सरपंच विजयराव गोरड, माजी सरपंच बाळू गोरड सर, युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिसे, माणिक कोकरे, गोरडवाडी गावचे पोलीस पाटील नाना यमगर पाटील, ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार आदी उपस्थित होते.

गोरडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील सर्व गटतट, पक्षभेद बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन गोरडवाडी ग्रामपंचायत बिनविरोध केलेली होती. त्यावेळेस सरपंच व उपसरपंच पदाचा कालावधी व पदास योग्य असणाऱ्या सदस्यांची नावे गावातील वयोवृद्ध व ज्येष्ठ मंडळी यांनी ठरवलेली होती. त्यामध्ये बाळू गोरड सर व युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा कालावधी संपल्यानंतर विजयराव गोरड यांना सरपंच पदाची संधी मिळालेली होती. ठरल्याप्रमाणे विजयराव गोरड यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर नूतन सरपंच पांडुरंग पिसे यांची निवड केली जाणार आहे. तहसील कार्यालयाकडून सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम झालेला आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दहा ते बारा या वेळेमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे.

गोरडवाडी ग्रामपंचायतीमधील पदाधिकारी यांनी राजीनामा देऊन ग्रामदैवत बिरोबा देवाचे खऱ्या अर्थाने भक्त असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे सुरू आहे. तालुक्यामध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी सत्ता संघर्ष सुरू आहे. ठरल्याप्रमाणे सरपंच व उपसरपंच राजीनामा तालुक्यामध्ये देत नाहीत. मात्र, गोरडवाडी गावचा आदर्श तालुक्यातील सरपंच, उपसरपंच यांनी घेण्यासारखा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Back to top button