गोरडवाडी येथे बिरोबा यात्रेनिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त भव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी ता. माळशिरस येथे माजी सरपंच कै. निवृत्ती (दादा) शंकर गोरड यांच्या स्मरणार्थ सरपंच विजय (दादा) निवृत्ती गोरड यांच्यातर्फे बिरोबा यात्रेनिमित्त व गुढीपाडव्यानिमित्त पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धा ‘सरपंच चषक’ चे आयोजन रविवार दि. १९/३/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता बिरोबा मंदिर, म्हसवड रोड, गोरडवाडी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस २१,००१ रुपयांचे माजी सरपंच कै. नानासो आबाजी कर्णवर पाटील व कै. तुकाराम (आप्पा) आबाजी कर्णवर पाटील यांच्या स्मरणार्थ सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाणे शहर चे सोमनाथ तुकाराम पाटील यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस १६,००१ रुपयांचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील व मांडकी ग्रामपंचायतीचे डबल सरपंच सुकुमार उर्फ किरण लालासो माने यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तृतीय बक्षीस ,११,००१ रुपयांचे कै. विठ्ठल महादेव पिसे यांच्या स्मरणार्थ दत्तू विठ्ठल पिसे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. चतुर्थ बक्षीस ७,००१ रुपयांचे गोरडवाडी ग्रामपंचायतचे सदस्य माणिक (भाऊ) भीमराव कोकरे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. पाचवे बक्षीस ५,००१ रुपयांचे कै. नानासाहेब मारुती कळसुले यांच्या स्मरणार्थ गोरडवाडी ग्रामपंचायतचे सदस्य दादा नानासाहेब कळसुले व मच्छिंद्र नानासाहेब कळसुले यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.
तसेच या स्पर्धेमध्ये वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज २,००१ रुपये माजी उपसरपंच शंकर विठ्ठल यमगर पाटील व शिवानी ज्वेलर्स यांच्या वतीने देण्यात येणार आहे. उत्कृष्ट फलंदाज २,००१ रुपये पुणे येथील इंजिनियर दत्तू बापू गोरड यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच २,००१ रुपये माजी सरपंच बाळू गोरड सर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज २,००१ रुपये मामा कळसुले यांच्यातर्फे तर उत्कृष्ट विकेट कीपर २,००१ रुपये सोसायटीचे माजी सदस्य आजिनाथ पंढरी कर्णवर पाटील यांच्या तर्फे, सलग चार विकेट घेणाऱ्यास १,००१ रुपये कै. नारायण यमगर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. तसेच सलग चार षटकार १,००१ रुपये म्हाकु धुळा यमगर यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक १,००१ रूपये आप्पा दगडू गोरड यांच्यातर्फे देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी बॉल स्पॉन्सर नानासाहेब निवृत्ती गोरड हे आहेत. तर कै. निवृत्ती (दादा) शंकर गोरड मित्र मंडळ, गोरडवाडी आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब, यमगरवस्ती यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ओंकार ऍग्रो साखर कारखाना चांदापुरीचे चेअरमन बाबुराव दादासाहेब बोत्रे पाटील, गोरडवाडी येथील फरांदे ॲग्रो चे अनिल (शेठ) फरांदे, बळीराम चव्हाण सर, रामचंद्र (तात्या) बाबुराव शिवरकर, गोरडवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच पांडुरंग (तात्या) पिसे, गोरडवाडी सोसायटीचे माजी चेअरमन खंडू (तात्या) कळसुले, गोरडवाडी सोसायटीचे चेअरमन सोमनाथ साधू कोकरे, गोरडवाडी सोसायटीचे सदस्य भारत गुलाब गोरड, माणकी ग्रामपंचायतचे उपसरपंच तानाजी रणनवरे सर आणि कांतीलाल लवटे यांचे विशेष सहकार्य असणार आहे. तरी जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींनी या मैदानास उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढविला, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng