घुमेरा वेळापूर येथील हनुमंतराव कदम पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन..
इरिगेशनमध्ये उजनी विभाग व निरा उजवा विभागाचे सेवा निवृत्त कर्मचारी होते.
वेळापूर ( बारामती झटका )
घुमेरा वेळापूर येथील हनुमंतराव भगवानराव कदम पाटील यांचे वयाच्या ७० व्या वर्षी गुरुवार दि. २६ जानेवारी २०२३ रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, जावई तीन भाऊ, भावजय व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वेळापूर-मळोली रोडवरील राहत्या घराशेजारी शेतामध्ये शोकाकुल वातावरणात त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता अंत्यविधी करण्यात आलेला आहे.
हनुमंतराव यांना दादा या नावाने ओळखले जात होते. दादांनी इरिगेशन विभागामधील उजनी कालवा व निरा उजवा कालवा येथे नोकरी केलेली आहे. त्यांनी पंढरपूर तालुक्यातील करकंब, भाळवणी व माळशिरस तालुक्यात नोकरी केलेली आहे. २०११ साली ते सेवानिवृत्त झाले होते. रक्षा विसर्जन (तिसऱ्याचा) कार्यक्रम शनिवार दि. २८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.३० वा. होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng