घुलेनगर येथे माऊली ग्रुपच्यावतीने पाणपोईची सुरुवात
पानीव (बारामती झटका)
पानीव ता. माळशिरस येथील घुले नगर येथे माऊली ग्रुप घुले नगर यांच्यावतीने रामनवमीचे औचित्य साधून व शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त तसेच पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविक भक्तांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या सामाजिक बांधिलकीतून पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
माऊली ग्रुप घुलेनगर यांच्यावतीने दरवर्षी पाणपोईचा सामाजिक उपक्रम राबविला जातो. सामाजिक बांधिलकीतून या पाणपोईची सोय शिखर शिंगणापूर यात्रेनिमित्त व पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी करण्यात आली आहे. यावेळी पाणीव गावचे उपसरपंच संदिप मारकड, पैलवान उद्योग समुहाचे मालक आकाश घुले, विजय घुले, दत्तु शिंदे, दिपक घुले, लावंड, हिराचंद दणाने, सोमनाथ वाघंबरे, नवनाथ घुले, गणेश कोकरे, जानकर साहेब, सूर्यकांत सकट, राजकुमार आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng