चळवळीचे सामर्थ्य अंगी असणारा पत्रकार म्हणजे सुजित सातपुते – खरात सर
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील दबासे वस्ती येथील एका शेतकऱ्याची व्यथा ऐकुन मन सुन्न झालं. नऊ बहिनी व एक भाऊ. बहिणींची लग्न, त्यानंतर त्यांच्या डिलीवरी व नंतर ऑपरेशन या सर्व कालावधीत वडिलांनी दहा एकर शेतीतील पाच एकर शेती विकली. आता मुलगा हाताखाली आला पण भांडवल नाही. मग मदत करणार कोण ? तर बॅंक, मग काय, बँकेचे उंबरठे झिजवायला सुरूवात झाली.
सर्वसामान्य माणसाला कोण कर्ज देतो. मोठमोठी माणसं भेटायची पण फायदा झाला नाही. मग यात एक व्यक्ती पर्वतासारखा सोबत ऊभा ठाकला तो म्हणजे पिलीव येथील पत्रकार सुजित दिगंबर सातपुते. वडील बासष्ट वर्षे वयाचे व मुलाला सह कर्जदार करून बँकेला कर्ज देण्यास भाग पाडले. आज तो शेतकरी नव्या जोमानं शेती करत आहे. भरपूर कमवलं, कर्ज फेडलं, आज लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे शक्य झालं, फक्त एका संवेदनशील पत्रकारामुळेच.
माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाला. खूप मोठं संकट त्या घरावरती आलं. कर्ता पुरुष गेल्यानं सर्व काही संपल. यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून दोन लाख रूपये पिडीतेला मिळवून दिले. स्वतःच्या खर्चाने सोलापूरपर्यंत केलेल्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं. चांदापूरी येथील एका दलित समाजाच्या व्यक्तीचा घात करुन त्याला अपघात दाखवला होता. त्या प्रकरणाचा पोलीसांना उलघडा करायला लावून पिडीत महीलेला आरोपींकडून दोन लाख रुपये मिळवून दिले.
परिसरातील कोणीही अकलुज, पंढरपूर येथे दवाखान्यात ॲडमिट असेल तर विविध योजनेत त्या पेशंटला बसवून मोफत उपचार करणे, लोकांचे वादविवाद पोलीस स्टेशनला न जावू देता आपआपसात मिटविणे, गरजू लोकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे या व अशा अनेक घटना मार्गी लावत सुजित सातपुते आपली सामाजिक बांधिलकी म्हणून निस्वार्थीपणे काम करत असल्याने तरुणांमध्ये त्यांची खूप मोठी क्रेझ वाढू लागली आहे. कोणत्याही भागातला व्यक्ती असो तो अडचणीत असेल तर हमखास त्याच्या मदतीला धावणारे सुजीत सातपुते.
एक पत्रकार/समाज सेवक म्हणून आपली खरी ताकत लावली तर, खूप मोठं काम करू शकतो हे यातून आपल्या कार्यातून सिद्ध होतं. त्यांच्याकडे पिलीव पंचक्रोशीतील येणारा प्रत्येक माणूस एक आधार म्हणून बघतो. सामाजिक सलोखा जपत अन्यायाच्या विरोधात निडरपणे, ठामपणे उभा राहण्याच्या वृत्तीमुळे आपण एक यशस्वी पत्रकार होऊ शकलात. यापुढेही आपणाकडून सदैव सत्कार्य घडावे हीच अपेक्षा या निमित्ताने इतकेच..! – खरात सर, चांदापूरी मो. 8766858819
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng