चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत शिंदे महाराज यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार
स्व. व्यंकटेश आंबु वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त माळशिरस येथील साठ फाटा या ठिकाणी कीर्तन सोहळ्याचे आयोजन.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील स्वर्गीय व्यंकटेश आंबु वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त चांडाळ चौकडीच्या करामती फेम बाळासाहेब उर्फ ह.भ.प. भरत महाराज शिंदे, बारामती यांचे सुश्राव्य कीर्तन रविवार दि. 25/09/2022 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये माळशिरस येथील 60 फाटा या ठिकाणी होणार आहे.

सदर किर्तन सोहळ्यावेळी उत्कृष्ट गायनासाठी गायनाचार्य ह.भ.प. गणेश महाराज धुमाळ देशमुखवाडी, ह.भ.प. आकाश महाराज गरगडे फलटण, मृदुंग वाजवण्यासाठी मृदुंगाचार्य पखवाज रत्नऋतिक महाराज पवार चोपडज बारामती हे उपस्थित राहणार आहेत.
तरी नातेवाईक व मित्रपरिवार यांनी वेळेवर उपस्थित राहून कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त वाघमोडे परिवार माळशिरस यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
