ताज्या बातम्यासामाजिक

पुरंदावडे गावचे ग्रामस्थांच्या उपोषणाला यश, ग्रामसेविका यांची सक्तीच्या रजेवर रवानगी.

श्री. संतोष प्रकाश ओवाळ व श्री. संघर्ष भगवान ओवाळ याचे ग्रामस्थ व घरातील नातेवाईक यांच्या पाठिंब्यामुळे उपोषण यशस्वी झाले.

पुरंदावडे (बारामती झटका)

पुरंदावडे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सौ. जे. एम. दीक्षित मॅडम यांच्या कारभाराविरोधात श्री. संतोष प्रकाश ओवाळ व श्री. संघर्ष भगवान ओवाळ या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर अन्नत्याग करून आमरण उपोषण सुरू केलेले होते. सदरच्या उपोषणास ग्रामस्थ व घरातील आई, पत्नी, नातेवाईक यांच्या पाठिंब्यामुळे उपोषण यशस्वी झालेले आहे. पुरंदावडे गावच्या ग्रामस्थांच्या उपोषणाला यश आलेले आहे. ग्रामसेविका दीक्षित मॅडम यांची सक्तीच्या रजेवर रवानगी केली असल्याचे पत्र पंचायत समिती माळशिरस कार्यालयाकडून देण्यात आलेले आहे.

श्री. संतोष प्रकाश ओवाळ व श्री. संघर्ष भगवान ओवाळ यांनी दि. 26/10/2023 पासून उपोषणास सुरुवात केलेली होती. बहात्तर तास झाल्यानंतर दोघांच्या तब्येती खालावलेल्या होत्या. त्यामुळे दोघांच्या आई व पत्नी लहान मुलांसह उपोषण स्थळी येऊन प्रशासनाला अल्टिमेट दिलेला होता जर का आमच्या मुलांना बरे वाईट झाले तर प्रशासनातील सर्व अधिकारी जबाबदार धरले जातील. सर्व वृत्तांत बारामती झटका यूट्यूब चॅनल वर थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. प्रशासन डोळे उघडून खडबडून जागे झाले. सायंकाळी पंचायत समिती मधील अधिकारी बुगड व विस्तार अधिकारी लोंढे यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती करून उपोषणकर्त्यांना पत्र दिलेले आहे.

सदरच्या पत्रामध्ये उपोषण कर्ते यांनी दि. 20/10/2023 रोजी दिलेल्या पत्राचा संदर्भ धरून ग्रामपंचायत पुरंदावडे येथील ग्रामसेविका जे. एम. दीक्षित या उद्दटपणाची भाषा वापरतात. योग्य उत्तरे देत नाहीत. नागरिकांना केस करणे बाबत धमकी देतात, अशा आरोपांचे पत्र देऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसल आहात. याबाबत जे. एम. दीक्षित ग्रामसेविका ग्रामपंचायत पुरंदावडे यांच्या कामकाजाची व दप्तराची सखोल तपासणी करून व तपासणीमध्ये दोष आढळून आलेस पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. त्याच बरोबर जे. एम. दीक्षित ग्रामसेविका ग्रामपंचायत पुरंदावडे यांचा दि. 27/10/2023 रोजी चा रजेचा अर्ज दाखल झालेला आहे. दि. 30/10/2023 पासून वैद्यकीय रजेवर गेलेले असलेले त्यांच्याकडील ग्रामपंचायत पुरंदावडे चा पदभार तात्पुरत्या स्वरूपात अन्य ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात आला व तसे आदेश दि. 30/10/2023 रोजी निर्गमित करीत आहेत. तरी आपण दि. 26/10/2023 रोजी पासून सुरू केलेले उपोषण स्थगित करून प्रशासनास सहकार्य करावे. असे पत्र दिलेले असल्याने उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या समक्ष श्री. बुगड व श्री. लोंढे यांनी उपोषण कर्ते यांनी उपोषण सोडलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort